दुधीचे धिरडे

#ब्रेकफास्ट
धिरडे हा महाराष्ट्राचा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. इथे मी त्याची पौष्टिकता वाढवण्याकरिता त्यात नाचणी पीठ व दुधीचा समावेश केला आहे. हे धिरडे पौष्टिकच नव्हे तर चविष्ट सुद्धा आहे. व हे धिरडे बनवण्यास ही सोप्पे आहे. तर चला पाहूया त्याची कृती....
दुधीचे धिरडे
#ब्रेकफास्ट
धिरडे हा महाराष्ट्राचा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. इथे मी त्याची पौष्टिकता वाढवण्याकरिता त्यात नाचणी पीठ व दुधीचा समावेश केला आहे. हे धिरडे पौष्टिकच नव्हे तर चविष्ट सुद्धा आहे. व हे धिरडे बनवण्यास ही सोप्पे आहे. तर चला पाहूया त्याची कृती....
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम, किसलेला दुधी पाण्यात भिजवून घट्ट पिळून घ्या. एका पातेलीत हा कीस एक टेबलस्पून पाणी घालून, झाकून शिजवून घ्या.
- 2
३-४ मिनीटांनी झाकण काढून, मध्यम आचेवर दुधीला सुटलेले पाणी आटवून घ्या. बाजूला ठेवून थंड होऊ द्या.
- 3
तीळ कोरडेच भाजून, मिक्सर वर खरखरीत वाटून घ्या.
- 4
एका वाडग्यात तीळ, वरील पीठं, रवा, शिजवलेला दुधीचा कीस, व पाणी व तूप सोडून इतर सर्व साहित्य एकत्र करा.
- 5
त्यात गरजेनुसार पाणी घालून ढवळून घ्या. गुठळ्या होऊ देऊ नका. डोशाच्या पीठासारखं सरसरीत पीठ भिजवून घ्या.
- 6
आता एका कढईत तेलाची फोडणी करुन त्यात राई घाला. राई तडतडली की चिरलेली कडीपत्त्याची पाने. ही फोडणी तयार पिठावर ओता व एकजीव करून घ्या. १/२ तास पीठ बाजूला ठेवा
- 7
धिरडे बनवण्याकरिता एक बीडाचा तवा तापवत ठेवा. त्यावर तेल पसरवून घ्या व साधारण १/२ कप पीठ ओता. पळीने ते गोलाकार पसरवून घ्या. धिरडे मध्यम जाडीचे ठेवा.
- 8
वरुन व कडेनी तूप सोडा व झाकण लावून बारिक आचेवर वाफवून घ्या.
- 9
थोड्या वेळानी झाकण काढून, धिरडे उल्टवून घ्या व माध्यम आचेवर भाजून घ्या. कडा हलक्या दाबून भाजून घ्या. खालील बाजू भाजली गेली की धिरडे थाळीत काढून घ्या.
- 10
हे पौष्टिक व चविष्ट दुधीचे धिरडे कोथिंबीर पुदिना चटणी सोबत नाश्त्याला वाढा. सोबत गरमागरम मसाला चहा नक्की द्या!!!
Top Search in
Similar Recipes
More Recipes



टिप्पण्या