बेक स्ट्रीप समोसा

Spruha Bari
Spruha Bari @chayya

#ब्रेकफास्ट
तेलाचा अतिरिक्त वापर आरोग्याला घातक असतो पण जिभेचे चोचले तर भारी म्हणून मी बनवला बेक समोसा पट्टी समोसा नेहमीपेक्षा वेगळा न तळता केलाय ,कसा वाटला?

बेक स्ट्रीप समोसा

#ब्रेकफास्ट
तेलाचा अतिरिक्त वापर आरोग्याला घातक असतो पण जिभेचे चोचले तर भारी म्हणून मी बनवला बेक समोसा पट्टी समोसा नेहमीपेक्षा वेगळा न तळता केलाय ,कसा वाटला?

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनिटे
  1. बटाटे २सारण- उकडलेले
  2. ४चमचेहिरवे वाटाणे दाणे
  3. १चमचाआले लसूण पेस्ट
  4. १चमचातिखट
  5. १/२चमचाहळद
  6. कांदा बारीक चिरून
  7. कोथिंबीर
  8. १चमचातेल
  9. मीठ चवीनुसार
  10. चमचा १/२जिरे,मोहरी प्रत्येकी
  11. १.५ वाटीपारी साठी- मैदा
  12. १चिमूटमीठ
  13. १चमचागरम तेल मोहन देण्यासाठी
  14. १/२चमचाओवा
  15. चिमूटभरखाण्याचा सोडा

कुकिंग सूचना

३०मिनिटे
  1. 1

    प्रथम मैद्यात चिमूटभर मीठ, ओवा, खाण्याचा सोडा,गरम तेलाचे मोहन घालून मिक्स करावे थोडे थोडे पाणी घालून मैदा घट्ट मळून झाकून ठेवावा

  2. 2

    आता २चमचे तेल तापवून जिते मोहरीची फोडणी करावी कांदा परतून घ्यावा,आले लसूण पेस्ट घालून परतावे मग तिखट,मीठ,हळद घालून मंद गॅसवर मिक्स करावे मग उकडून कुस्करलेलाला बटाटा व वाफवलेल्या वाटाणे दाणे घालून मिक्स करून एक वाफ घालून उतरून घ्यावे कोथिंबीर घालून गार करावे सारण तयार.पूर्वतयारी झाली

  3. 3

    आता मैद्याचे गोळे करून मोठी पुरी लाटावी व मधून २भाग करावे एका भागावर सुरीने पट्टीचे काप मारावे टोके मात्र जुळलेली असावी

  4. 4

    पट्टीच्या भागावर सलग भाग ठेवून प्रेस करावा म्हणजे दोन्ही भाग चिकटतात

  5. 5

    आता नेहमीप्रमाणे हातावर कोन बनवून आत सारण भरून समोसा बंद करावा याप्रमाणे सर्व समोसे भरून घ्यावे

  6. 6

    आता गॅसवर cooker ठेवून त्यात मीठ घालावे व स्टँड ठेवून १५मिनिटे कूकर तपवावा आता त्या स्टँडवर स्टफ्फ केलेले समोसे ठेवून १५मिनिटे बेक करा टूथपिक ने समोसे बेक झाल्याची खात्री करून गॅस बंद करा

  7. 7

    बेक समोसे तयार ओवन मध्येही बेक करू शकता

  8. 8

    शेंगदाणा चटणी किंवा चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Spruha Bari
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes