चणाडाळ आणि घोसाळ्याची भाजी
कुकिंग सूचना
- 1
चणाडाळ वीस मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. घोसाळ्याच्या शीरा काढून बारीक तुकडे करून घ्या. एका कढईत दोन टेबलस्पून तेल तापवून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात जीरे, लसूण आणि हिरवी मिरची घाला. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तांबूस होईपर्यंत परता.
- 2
आता त्यात भिजवलेली चणाडाळ घालून परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला घातला आणि परता. आता त्यात बारीक चिरलेले घोसाळ्याचे तुकडे घाला. आता त्यात चवीपुरते मीठ घालून झाकण ठेवून वाफ आणावी.
- 3
ओल्या नारळाचा चव घालून घोसाळ्याची भाजी एकदा परतून घ्यावी. खाण्यासाठी चणाडाळ घालून घोसाळ्याची भाजी तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12399993












टिप्पण्या