रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. 1/2 कपतूर डाळ
  2. 1/2 कपमूग डाळ
  3. 1/2 कपमसूर डाळ
  4. 2मध्यम आकाराचा कांदा
  5. 1टोमॅटो
  6. 6-7लसूण पाकळ्या
  7. 1/4 वाटीचिरलेली कोथिंबीर
  8. 1/4 टी स्पूनहिंग
  9. 1 टी स्पूनलाल तिखट
  10. 1 टी स्पूनघरगुती मसाला
  11. 1/4 टी स्पूनमोहरी
  12. 1/4 टी स्पूनजिरे
  13. 2 टेबल स्पूनतेल
  14. चवीनुसारमिठ
  15. 1गुळाचा खडा
  16. 1/4 वाटीओले वाटणे
  17. 1/4 वाटीशेंगदाणे
  18. 1 चमचाउडीद डाळ
  19. 1 कपकणिक
  20. 1/4 टी स्पूनओवा
  21. 1/4 टी स्पूनहळद
  22. 1/2 टी स्पूनलाल तिखट
  23. 1/4 टी स्पूनमीठ
  24. 1/4 टी स्पूनजिरे
  25. 2 चमचेचिरलेली कोथिंबीर
  26. 1 टी स्पूनतेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्व डाळी स्वच्छ धुवून 1/2 तास भिजत ठेवा. वनंतर यात हिंग हळद घालून शिजवून घ्या.

  2. 2

    डाळ शिजते तोपर्यंत कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या. लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्या. आवडत असल्यास लिंबू फोडी करून घ्या. कोथिंबीर बारीक चिरून घ्या. एका भांड्यात कणिक घ्या, यात थोडी कोथिंबीर घालून घ्या. यात अगदी थोडे मीठ, हळद, लाल तिखट, ओवा जिरे व तेल घालून पोळी साठी मळतो तसे कणिक मळून घ्या. वरून तेलाचा हात लावून घ्या.

  3. 3

    डाळ शिजली असेल, तिला चमच्याने घोटून घ्या. एका भांड्यात तेल घालून गरम करून त घ्या. यात हिंग मोहरी जिरे यांची फोडणी करून घ्या. छान फोडणी तडतडली की यात लसूण घाला, सोबत भिजवलेली उडीद डाळ घालावी. लसूण सोनेरी झाला की कांदा परतून घ्या. कांड्यासोबत शेंग दाणे, वाटणे देखील घालून परतावे.

  4. 4

    कांदा नरम झाला की यात लाल तिखट, मीठ, गूळ, हळद, मसाला घालून घ्या, यात टोमॅटो बारीक चिरून घाला व एकजीव परतून घ्या. टोमॅटो नरम झाले की शिजलेली डाळ घालावी.

  5. 5

    आवश्यकतेनुसार पाणी घालून वरण थोडे पातळ करुन घ्या. वरण उकळते तोवर कणकेचा गोळा करून त्याची पोळी लाटून घ्या. या पोळीचे चौकोनी तुकडे करून घ्या, जसे शंकरपाळी करतो. हे तुकडे एक एक करून वरणात सोडावे.

  6. 6

    सर्व धोकली सोडली की पुन्हा चार पाच मिनिटे शिजू द्या. छान उकळी आली की वरून कोथिंबीर घालून घ्या. गॅस बंद करा.

  7. 7

    लिंबाच्या फोडी सोबत गरम गरम डाळ धोकळी सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes