रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)

#फोटोग्राफी
#खीर
रव्याची खीर हा पदार्थ भारतात सगळ्या प्रांतात केला जातो. सणासुदीला नैवेद्याच्या ताटात, काही खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पुरीबरोबर किंवा असंच कधीही स्वीट डिश म्हणून ही खीर केली जाते. रेसिपी अगदी सोपी आहे. बारीक रवा,दूध आणि साखर हे मुख्य जिन्नस लागतात आणि स्वादासाठी वेलची, केशर, सुका मेवा घातला जातो.

कुकिंग सूचना
- 1
एक चमचा कोमट दुधात केशर अर्धा तास भिजवून ठेवा.
- 2
एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध आटवून १ लिटर करा.
- 3
एका जाड बुडाच्या पातेल्यात १ चमचा साजूक तूप घालून रवा मंद आचेवर लालसर रंगावर भाजून घ्या.
- 4
रव्यात उकळतं दूध घालून ३-४ मिनिटं मंद आचेवर शिजवा.
- 5
आता त्यात साखर घालून मिश्रण २-३ उकळा.
- 6
वेलची पूड, भिजवलेलं केशर, सुका मेवा घालून २ मिनिटं उकळा.
- 7
स्वादिष्ट खीर तयार आहे. गरम किंवा गार कशीही छान लागते. अशीच किंवा पुरी / पोळीबरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या