दलिया शिरा / लापशी रव्याचा शिरा (daliya lapshi shira recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#फोटोग्राफी
#शिरा
दलिया / लापशी रवा म्हणजे गव्हाचा रवा. हा किराणा दुकानात मिळतो. खूप पौष्टिक असतो हा रवा. मी ह्या शिऱ्यामध्ये गूळ घालते (साखरेपेक्षा चांगला) आणि डिंक तळून घालते. मस्त खमंग आणि स्वादिष्ट बनतो हा शिरा.

दलिया शिरा / लापशी रव्याचा शिरा (daliya lapshi shira recipe in marathi)

#फोटोग्राफी
#शिरा
दलिया / लापशी रवा म्हणजे गव्हाचा रवा. हा किराणा दुकानात मिळतो. खूप पौष्टिक असतो हा रवा. मी ह्या शिऱ्यामध्ये गूळ घालते (साखरेपेक्षा चांगला) आणि डिंक तळून घालते. मस्त खमंग आणि स्वादिष्ट बनतो हा शिरा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

8 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपदलिया
  2. १ कपचिरलेला गूळ पाऊण ते (शिरा जसा गोड हवा असेल त्याप्रमाणे घाला)
  3. 3 टेबलस्पूनसाजूक तूप
  4. 2 टेबलस्पूनडिंक
  5. 1/4 कपदूध
  6. ८-१०बदाम
  7. १०-१२काजू
  8. ४-५ केशर काड्या
  9. 1/4 टीस्पूनवेलची पूड
  10. मीठ चिमूटभर (ऐच्छिक)

कुकिंग सूचना

  1. 1

    बदाम गरम पाण्यात अर्धा तास भिजवून सोलून बारीक काप करा. केशर चमचाभर पाण्यात भिजवा. 

  2. 2

    एका कढईत २ चमचे तूप घालून त्यात डिंक मंद आचेवर तळून घ्या. ताटलीत काढून घ्या.

  3. 3

    त्याच तुपात काजूचे तुकडे तळून वेगळे काढून ठेवा.

  4. 4

    त्याच कढईत २ टेबलस्पून तूप घालून दलिया मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या.

  5. 5

    साडेतीन कप पाणी गरम करा. दूध ही वेगळे गरम करा.

  6. 6

    पाणी आणि दूध उकळलं की दलियात घाला. ढवळा. झाकण ठेवून दलिया नरम होईपर्यंत शिजवा. हवं असेल तर आणखी पाणी घाला. दलिया जाड असेल तर पाणी जास्त लागते.

  7. 7

    दलिया शिजला की गूळ घालून ढवळा. शिरा जेवढा घट्ट हवा असेल तेवढा शिजवा.

  8. 8

    गूळ वितळला की तळलेला डिंक घाला. केशर, बदाम, काजू, वेलची पूड आणि मीठ घालून ढवळा.

  9. 9

    १ चमचा तूप घालून ढवळा.

  10. 10

    स्वादिष्ट दलिया शिरा तयार आहे. गरमागरम शिऱ्याचा आनंद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes