रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 50 ग्रामबडीशेप
  2. 50 ग्रामधने
  3. 50 ग्रामजिरे
  4. 250 ग्राममूगडाळ (2 ते 4 तास भिजवावी)
  5. 4-5 चमचेबेसन
  6. 4हिरव्या मिरच्या
  7. 2 चमचेलाल तिखट
  8. 1 चमचाहळद
  9. 1/4 चमचाहिंग
  10. 2 चमचेगरम मसाला
  11. 1/4 इंचआल्या चा तुकडा
  12. 4 कपमैदा
  13. 6 चमचेगरम तूप
  14. पाणी
  15. तळण्यासाठी तेल
  16. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भांड्यात मैदा व तूप घेउन थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.

  2. 2

    मिक्सर मध्ये बडीशेप, धने व जिरे ह्यांची भरड करावी.

  3. 3

    एका कढईत तेल घ्यावे. त्यात वरील मसाला घालावा व परतून घ्यावा. त्यात बेसन घालून परतून घ्यावे.

  4. 4

    त्यात हळद, लाल तिखट, हिंग, मीठ,गरम मसाला व आलं मिरची ची पेस्ट घालून परतून घ्यावे.

  5. 5

    भिजवलेली मूग डाळ मिक्सर मध्ये जडसर वाटून घ्यावे. वाटलेली डाळ वरील मिश्रणात मिक्स करावी व झाकण देऊन एक वाफ काढावी.

  6. 6

    मैद्या च्या पीठाच्या पुर्या करून त्यात मूगडाळीचे सारण भरावे व हलक्या हाताने लाटणे फिरवावे.

  7. 7

    एका कढईत तेल गरम करून मंद आचेवर कचोर्या तळून घ्याव्या व तिखट आणि गोड चटणी बरोबर सर्व्ह कराव्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes