देसी स्टाईल मिक्स पास्ता (desi style mixed pasta recipe in marathi)

#रेसिपीबुक
#पास्ता
पास्ता ही एक इटालियन डिश आहे.पास्ताचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत. भारतीय शाकाहारी पदार्थ,मसाले घालण्याने पास्ता हेल्दी होतो. म्हणजे आपण तो घरी तयार करू शकतो. पास्ता मुख्यत्वे पिठापासून नूडल्सपासून बनवलेला असतो. .आजकाल सर्वानाच आपल्या घरगुती पदार्थांपेक्षा बाहेर मिळणारे इतर पदार्थ अधिक आवडतात. हेच पदार्थ जर घरी बनवले तर लहान मुलांचं आणि पर्यायाने सर्वांचं आरोग्य जपलं जातं🙂.बरेच लोक पास्ता स्नॅक म्हणून पसंत करतात.पास्ता हे पारंपारिक इटालियन मुख्य अन्न आहे,असे मी इंटरनेटवर वाचले होते. ही स्वादिष्ट डिश आहे आणि बरीच जीवनसत्त्वे देखील भाज्यामुळे मिळतात. 🥕🍅भाज्यांचा वापर करुन बनवलेला चटकदार पास्ता,सहसा ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवला जातो. मी साजूक तूप वापरले आहे.याशिवाय बरेच लोक भाजलेले पास्ताही बनवतात .पास्ता बाजारामध्ये बर्याच आकारात उपलब्ध आहे, ज्यामध्ये नोजल्स, गोलाकार आणि भरीव साइज़ विशेष आहेत. मसाला पास्ता आणि चीज पास्ता सर्वाधिक जास्त आवडीने खाल्ले जातात.उकळत्या पाण्यातून शिजलेला गरम पास्ता थेट गरम ग्रेव्हीमध्ये मिसळा. जर आपण हे केलं तर पास्ता कोरडा होणार नाही. पास्ता छान ज्युसी बनेल

कुकिंग सूचना
- 1
कढईत तूप गरम करा. जिरे, बारीक चिरलेला कांदा, ताजे गाजर, सिमला मिरची,टोमॅटो हिरवी मिरची घालून चांगले मिसळून घ्या.आपण आपल्या आवडीनुसार भाज्या घालू शकता 5 मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्या.
- 2
लाल तिखट, पास्ता मसाला,काळीमिरी पावडर, चिली फ्लेक्स,मिक्स हर्ब्स,घाला आणि चांगले मिसळून घ्या.टोमॅटो केचप, मीठ साखर घालून मिक्स करावे. 5 मनिट चांगले शिजवा
- 3
पास्ता व्यवस्थित शिजवून घ्या.शिजवलेला पास्ता गरम पाण्यातून ग्रेव्हीवर टाका. व्यवस्थित मिसळून घ्या.फक्त 3 मिनिटे शिजू द्यावे. चीज मिक्स करावे. हवी असल्यास वरून कोथिंबीर भुरभुरावी. पास्ता तयार आहे
- 4
गरमागरम पास्ता सर्व्ह करा. पास्ता थंड खाण्यात काही मजा नाही.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या