नारळी भात- नारळी पौर्णिमा स्पेशल (narali baht recipe in marathi)

#रेसिपीबुक #week8
#नारळीपौर्णिमा
नारळी पौर्णिमेनिमित्त खास कोकणातली रेसिपी. नारळी भात नारळ आणि गूळ घालून बनवलेला स्वादिष्ट पदार्थ आहे. अतिशय सोपी रेसिपी. पाक बनवायला नको; मुद्दाम काही जिन्नस आणायला नकोत. घरात नेहमी असणारे जिन्नस वापरून करून बघा हा नारळी भात.

कुकिंग सूचना
- 1
तांदूळ धुवून निथळून १५ मिनिटं ठेवा.
- 2
बदाम गरम पाण्यात भिजवून ठेवा ; केशर गरम दुधात भिजवून ठेवा.
- 3
एका पातेल्यात अर्धा चमचा तूप घालून त्यात काजू मंद आचेवर तळून घ्या. ताटलीत काढून ठेवा.
- 4
त्याच तुपात बेदाणे (किसमिस) तळून घ्या आणि ताटलीत काढून ठेवा.
- 5
पातेल्यात आणखी अर्धा चमचा तूप घालून लवंगा घालून तळून घ्या. लवंगा बाहेर काढू नका.
- 6
त्यातच तांदूळ घालून सुके होईपर्यंत परतून घ्या.
- 7
आता पातेल्यात ४ कप गरम पाणी घाला. चिमूटभर मीठ घालून भात शिजवून घ्या. मी राईस कुकर मध्ये भात शिजवते. भात छान मोकळा झाला पाहिजे. भात गार होऊ द्या.
- 8
बदाम सोलून त्याचे पातळ तुकडे करून घ्या.
- 9
एका कढईत नारळ आणि गूळ घालून मंद आचेवर शिजवा. मिश्रण एकजीव झाले की त्यात शिजलेला भात घाला.
- 10
भातात बदाम, काजू, बेदाणे, केशर घालून मिक्स करा.
- 11
उरलेले तूप घालून झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटं शिजवा.
- 12
स्वादिष्ट नारळी भात तयार आहे. गरम किंवा गार कसाही खाऊ शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या