नारळी भात- नारळी पौर्णिमा स्पेशल (narali baht recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week8
#नारळीपौर्णिमा
नारळी पौर्णिमेनिमित्त खास कोकणातली रेसिपी. नारळी भात नारळ आणि गूळ घालून बनवलेला स्वादिष्ट पदार्थ आहे. अतिशय सोपी रेसिपी. पाक बनवायला नको; मुद्दाम काही जिन्नस आणायला नकोत. घरात नेहमी असणारे जिन्नस वापरून करून बघा हा नारळी भात.

नारळी भात- नारळी पौर्णिमा स्पेशल (narali baht recipe in marathi)

#रेसिपीबुक #week8
#नारळीपौर्णिमा
नारळी पौर्णिमेनिमित्त खास कोकणातली रेसिपी. नारळी भात नारळ आणि गूळ घालून बनवलेला स्वादिष्ट पदार्थ आहे. अतिशय सोपी रेसिपी. पाक बनवायला नको; मुद्दाम काही जिन्नस आणायला नकोत. घरात नेहमी असणारे जिन्नस वापरून करून बघा हा नारळी भात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. २ कपतांदूळ (बारीक दाण्याचा तांदूळ घ्या - कोलम / आंबेमोहोर ; बासमती घेऊ नका)
  2. 1/4 कप ताजा खवलेला नारळ
  3. 2+ 1/2 कप गूळ
  4. २०-२५बदाम
  5. २०-२५काजू
  6. २०-२५बेदाणे (किसमिस)
  7. 2 चिमूटकेशर
  8. 1/2 टीस्पूनदूध केशर भिजवायला
  9. चवीनुसारमीठ
  10. 2 टेबलस्पूनसाजूक तूप

कुकिंग सूचना

60 मि
  1. 1

    तांदूळ धुवून निथळून १५ मिनिटं ठेवा.

  2. 2

    बदाम गरम पाण्यात भिजवून ठेवा ; केशर गरम दुधात भिजवून ठेवा.

  3. 3

    एका पातेल्यात अर्धा चमचा तूप घालून त्यात काजू मंद आचेवर तळून घ्या. ताटलीत काढून ठेवा.

  4. 4

    त्याच तुपात बेदाणे (किसमिस) तळून घ्या आणि ताटलीत काढून ठेवा.

  5. 5

    पातेल्यात आणखी अर्धा चमचा तूप घालून लवंगा घालून तळून घ्या. लवंगा बाहेर काढू नका.

  6. 6

    त्यातच तांदूळ घालून सुके होईपर्यंत परतून घ्या.

  7. 7

    आता पातेल्यात ४ कप गरम पाणी घाला. चिमूटभर मीठ घालून भात शिजवून घ्या. मी राईस कुकर मध्ये भात शिजवते. भात छान मोकळा झाला पाहिजे. भात गार होऊ द्या.

  8. 8

    बदाम सोलून त्याचे पातळ तुकडे करून घ्या.

  9. 9

    एका कढईत नारळ आणि गूळ घालून मंद आचेवर शिजवा. मिश्रण एकजीव झाले की त्यात शिजलेला भात घाला.

  10. 10

    भातात बदाम, काजू, बेदाणे, केशर घालून मिक्स करा.

  11. 11

    उरलेले तूप घालून झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटं शिजवा.

  12. 12

    स्वादिष्ट नारळी भात तयार आहे. गरम किंवा गार कसाही खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes