व्हाईट सॉस पास्ता - हल्लीच्या पिढीचा आवडता पदार्थ (white sauce pasta recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#दूध
दुधाच्या रेसिपिजच्या थीम साठी एक वेगळी रेसिपि पोस्ट करतेय. 
हल्लीच्या पिढीला पास्ता, पिझ्झा अशा पदार्थांचं वेड असतं. आपले पारंपरिक पदार्थही ही पिढी आवडीनं खाते. पण कधी कधी पास्ता, पिझ्झाच हवा असतो. पास्ता मुख्यतः दोन प्रकारे बनवतात. पांढरा सॉस बनवून आणि तांबडा सॉस बनवून (कोल्हापूरच्या पांढरा / तांबडा रस्सा च्या चालीवर .... ). पांढऱ्या सॉस मध्ये दूध आणि चीज असतं तर तांबड्या सॉस मध्ये टोमॅटो असतो. पास्ता वेगवेगळ्या आकारात मिळतो. ह्या रेसिपिसाठी पेने पास्ता वापरलाय. रेसिपि सोपी आहे. पण बटर, चीज अगदी सढळ हाताने वापरावं लागतं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

120 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. २०० ग्रॅम पेने पास्ता
  2. 1 लिटरदूध
  3. २०० ग्रॅम बटर
  4. २५० ग्रॅम चीज
  5. १/८ कपमैदा
  6. 1हिरवी ढोबळी मिरची
  7. 1लाल ढोबळी मिरची
  8. २०० ग्रॅम ब्रोकोली
  9. 1 कपमक्याचे दाणे
  10. आवडीनुसारऑलिव्ह
  11. 1 टीस्पूनतेल
  12. चवीनुसारकाळी मिरी पूड
  13. चवीनुसारमिक्स हर्ब्स (ऐच्छिक)
  14. चवीनुसारओरिगानो (ऐच्छिक)
  15. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

120 मि
  1. 1

    एका मोठ्या पातेल्यात २ लिटर पाणी घ्या. त्यात तेल आणि अर्धा टीस्पून मीठ घाला. पाणी उकळू द्या. पाणी उकळलं की त्यात पास्ता घाला आणि नरम होईपर्यंत शिजवा. जास्त शिजवू नका. नाहीतर नंतर त्याचे तुकडे होतात.

  2. 2

    पास्ता शिजला की एका चाळणीत काढून घ्या म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल. पास्तावर गार पाणी ओता म्हणजे तो आणखी शिजणार नाही.दोन्ही ढोबळी मिरच्यांचे पातळ तुकडे (slice) करून घ्या. ब्रोकोली चे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या

  3. 3

    एका कढईत अर्धा टीस्पून बटर घालून त्यात दोन्ही ढोबळी परतून अर्धवट शिजवून घ्या.ब्रोकोली आणि मक्याचे दाणे वेगवेगळे शिजवून घ्या.सॉस साठी एका मोठ्या कढईत बटर गरम करा. बटर वितळले की त्यात मैदा घालून परतून घ्या.आता त्यात दूध घालून नीट ढवळून एक उकळी काढा.

  4. 4

    त्यात चीज किसून घाला. चीज वितळले की त्यात मीठ, मिरपूड आणि मिक्स हर्ब्ज घाला.  उकळी काढा. व्हाईट सॉस तयार आहे.

  5. 5

    सॉस मध्ये शिजवलेला पास्ता आणि सगळ्या भाज्या घाला. नीट ढवळून घ्या आणि बारीक गॅसवर शिजवा. सॉस जेवढं दाट / पातळ हवं असेल त्याप्रमाणे शिजवत रहा. मिश्रण मधे मधे ढवळा म्हणजे कढईला चिकटणार नाही.

  6. 6

    पास्ता सर्व्ह करताना वरून ओरिगानो आणि ऑलिव्ह घालून सर्व्ह करा. यम्मी पास्ता एन्जॉय करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes