फ्राईड मोदक (fried modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #week10
#मोदक #प्रसाद #प्रसादाचीरेसिपी
हे आहेत गव्हाच्या पिठापासून बनवलेले स्वादिष्ट असे फ्राईड मोदक जे की मी प्रथमच ट्राय केले व उत्तम साध्य झाले. बऱ्याचदा मैदा वापरला जातो फ्राईड मोदक साठी पण मी हे आपल्या उरलेल्या गव्हाच्या कणिक पासून बनवले आहेत ज्यात मैदा अत्यंत अल्प प्रमाणात वापरला आहे.
झटपट होणारे हे मोदक तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम गव्हाच्या कणकेत मीठ,मैदा व रवा घालून मिक्स करून घ्या. मी थोडा खाण्याचा रंग वापरला आहे.पर्यायी आहे. गरज नाही.
- 2
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात गूळ व खोबरं घालून परतून घ्या गुळ वितळू लागेल. मग त्यात ड्राय फ्रूट व वेलचीपूड घालून परतून घ्या. सारण तयार आहे.
- 3
आता तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या व पारी लाटून त्यात सारण भरून मोदकाचा आकार देऊन घ्या.
- 4
तेल गरम करून घ्या व मध्यम आचेवर मोदक तळून घ्या. मोदक तयार आहेत.
- 5
वरून तूप घालून सर्व्ह करा चटपटीत व स्वादिष्ट असे फ्राईड मोदक!!!
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या