मुंबई स्पेशल बटाटे वडा (vada pav recipe in marathi)

Ankita Cookpad @cook_18445792
मुंबई स्पेशल बटाटे वडा (vada pav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडून मॅश करून घ्यायचे आहे
- 2
एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. त्यात राई ॲड करा. राई चांगली तडतडली पाहिजे. मग कढीपत्ता, आले लसूण मिरची पेस्ट घाला आणि चांगले मिक्स करून घ्या.
- 3
मग गॅसची फ्लेम कमी करा आणि त्यात हळद आणि कोथिंबीर ॲड करा. एक मिनीट परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला, उकडलेले बटाटे ॲड करा आणि मिक्स करून घ्या.
- 4
मिश्रण थोडावेळ थंड करून ठेवा आणि मग त्याचे असे गोळे बनवून घ्या.
- 5
त्यानंतर एका बोल मध्ये बेसन घ्या, तांदळाचे पीठ आणि खायचा सोडा चावीनुसार मीठ ॲड करा. थोडे थोडे पाणी घालून पेस्ट करून घ्या
- 6
आता एका पॅनमध्ये तळण्यासाठी तेल गरम करून घ्या. तेल चांगले गरम झाले की बटाट्याचे होळे या बॅटर मध्ये डिप करून चांगले कोट करून घ्या. गरम तेलामध्ये गोल्डन ब्राऊन फ्राय करा
- 7
गरम गरम वडे मुंबईची खास वडापाव चटणी आणि पावाबरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13539305


















टिप्पण्या (10)