व्हेज स्टीम मोमोज (veg steam momos recipe in marathi)

#मोमोज#सप्टेंबर
व्हेज मोमोज
मोमोज हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे.ही एक तिबेटीयन रेसिपी आहे. नेपाळ,सिक्कीम,हिमाचलप्रदेश,आणि दिल्लीकडे नॉर्थसाईड ला गेलात तर जागोजागी तुम्हाला मोमोज मिळतात.तिथे हे स्ट्रीटफूड म्हणून खूप फेमस आहे.आपल्या इथे ही सर्वांना मोमोज खूप आवडतात. मोमोज मधील भाज्या स्टीम केल्याने ही रेसिपी तेवढीच हेल्दी बनते.मोमोज बनवताना तुम्हाला आपले मोदक नक्कीच आठवतील. फक्त आतल सारण वेगळं बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम. मोमोज ला तुम्ही हवा तो आकार द्या. वास्तविक तिबेटच्या मोमोज चवीबद्दल काही कल्पना नाही परंतु मी बनवलेल्या मोमोज ची चव अफलातून होती .

कुकिंग सूचना
- 1
एक बाऊलमध्ये मैदा, मीठ, तेल एकत्र मिसळून पाणी घालून पीठ मळून घ्यावे. मळलेले पीठ 15-20 मिनिटे झाकून ठेवा. किसलेल्या कोबीमधील पाणी घट्ट पिळून काढा.
- 2
सर्व चिरलेल्या भाज्या एकत्र करा. त्यामध्ये सैंधव मीठ, गरम मसाला, जिरेपूड, काळीमिरीपूड, धणेपूड, किसलेले आले, कोथिंबीर, मिरची व्यवस्थित मिसळून घ्या. भिजवलेल्या मैद्याचे १ इंचाचे छोटे गोळे करावे. त्याची पातळ पोळी लाटून घ्यावी. मध्यभागी १-२ चमचे सारण ठेवावे.
- 3
एक कड हातात घेउन मध्यभागी आणावी. छोट्या-छोट्या चुण्या करून पहिल्या चुणीच्या मागे चिकटवाव्यात. अशाप्रकारे गोल पूर्ण करावा. तसेच करंजीच्या आकारातही मोमोज बनवता येतात. सर्व मोमोज बनवून घ्यावेत. मोमोज ला तुम्ही हवा तो आकार देऊ शकतात.
- 4
इडली पात्रात पाणी उकळवत ठेवावे. इडली स्टॅंडला तेलाचा हात लावावा. त्यावर मोमोज ठेवून १०-१२ मिनिटे वाफवून घ्यावे. ५ मिनिटांनी इडली पात्र उघडून मोमोज काढावेत.
- 5
गरमागरम मोमोज चिली सॉस किंवा शेजवान सॉस,चटणी बरोबर सर्व्ह करावेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या