व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कव्हर बनवून घ्यावे. त्यासाठी मैदा, मिठ, तेल एकत्र करून पाणी घालून पीठ मळून घ्यावे. झाकण ठेवून १५-२० मिनिटे ठेवावे.
- 2
सारण बनवण्यासाठी कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण आले आणि मिरची परतून घ्यावी. सर्व भाज्या एकत्र घालाव्यात.
- 3
मोठ्या आचेवर १-२ मिनिटे परताव्यात. त्यात मिठ, मिरपूड आणि सोया सॉस घालावा. तयार सारण एका वाडग्यात काढून घ्यावे.
- 4
भिजवलेल्या मैद्याचे १ इंचाचे छोटे गोळे करावे. त्याची पातळ पोळी लाटून घ्यावी. मध्यभागी १-२ चमचे सारण ठेवावे. एक कड हातात घेउन मध्यभागी आणावी. छोट्या-छोट्या चुण्या करून पहिल्या चुणीच्या मागे चिकटवाव्यात. अशाप्रकारे गोल पूर्ण करावा.
- 5
तसेच करंजीच्या आकारातही मोमोज बनवता येतात. तयार झालेले मोमोज पिळून घेतलेल्या ओल्या कपड्याखाली ठेवावेत. सर्व मोमोज बनवून घ्यावेत.
- 6
इडली पात्रात पाणी उकळवत ठेवावे. इडली स्टॅंडला तेलाचा हात लावावा. त्यावर मोमोज ठेवून १०-१२ मिनिटे वाफवून घ्यावे. ५ मिनिटांनी इडली पात्र उघडून मोमोज काढावेत.
- 7
गरमागरम मोमोज चिली सॉस किंवा शेजवान सॉस बरोबर सर्व्ह करावेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes





















टिप्पण्या