अंकुरित मटकी आणि मूग डाळीचे अप्पे (matki ani moong dal appe recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11 # अप्पे. मी हे अप्पे मोड आलेल्या मटकी पासून व मुगाच्या डाळीपासून केलेले आहेत. एक हेल्दी, स्वादिष्ट अशी डिश तयार होते. चला तर मग बघुया... पौष्टिक अप्पे...

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मटकीला रात्रभर भिजत घालून त्यातलं पाणी निथळून एका कापडामध्ये बांधून त्याला अंकुरित होऊ देणे तसेच मुगाची डाळ पण तीन-चार तास भिजत घालने. आता ही मुगाची डाळ व अंकुरित मटकी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घेणे.
- 2
आता या बारीक केलेल्या मिश्रणामध्ये तिखट, मीठ, हळद,धने पावडर,जिरे पावडर,अद्रक लसणाची पेस्ट,हिरव्या मिरच्यांची पेस्ट, कांदे, टोमॅटो वरील सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य टाकून मिक्स करून घेणे.
- 3
अप्पे पात्रामध्ये तेल टाकून त्यामध्ये हे मिश्रण थोडं थोडं करून टाकावे. मग झाकण ठेवून मंद आचेवर दहा-पंधरा मिनिटे होऊ द्यावेत.त्यानंतर झाकण उघडून परत दुसऱ्या साईडने पलटून होऊ द्यावे.
- 4
आपले अप्पे खाण्यासाठी रेडी आहेत. तेव्हा हे पोष्टिक अप्पे दह्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी,खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत आपण खाऊ शकतो. तर नक्की करून बघा मोड आलेल्या मटकीचे आणि मुगाच्या डाळीचे अप्पे
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या