स्पॅनिश आम्लेट (spanish omelette recipe in marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#GA4 #week2
स्पॅनिश ऑमलेट किंवा स्पॅनिश टॉर्टिला ही स्पेनची पारंपारिक डिश आहे. आणि स्पॅनिश पाककृतीतील एक महत्वाची डिश आहे. हे अंडी आणि बटाटे वापरुन बनविलेले एक आम्लेट आहे. आपण त्यात आणखी वेगवेगळे पदार्थ घालून ते अजून चविष्ट करु शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीटं
१ सर्व्हिंग
  1. 1उकडलेला बटाटा
  2. 1मध्यम आकाराचा कांदा
  3. 1अंड
  4. 1/4 टीस्पूनमिरेपुड
  5. 1 टीस्पूनचाट मसाला
  6. 1/2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबिर
  7. 1हिरवी मिरची
  8. 2 टेबलस्पूनबटर
  9. 1चीझ क्युब
  10. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

१५ मिनीटं
  1. 1

    प्रथम उकडलेला बटाटा कुस्करुन घ्यावा. कांदा चिरुन घ्यावा. मग त्यात मिरेपुड, चाट मसाला, कोथिंबिर आणि मीठ घालावं.

  2. 2

    आता वरील मिश्रणात अंड फोडून घालावं आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून एकत्र करुन घ्यावं.

  3. 3

    तव्यावर बटर घालून ते वितळल्यावर त्यावर तयार केलेल्या मिश्रणातील अर्धे मिश्रण पसरावे. मग त्यावर किसलेले चीझ घालावे आणि वरती उरलेले अर्धे मिश्रण घालावे व झाकण ठेवावे.

  4. 4

    दोन्ही बाजूने आम्लेट खरपूस भाजून घ्यावे. स्पॅनिश आम्लेट खायला तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

Similar Recipes