खमंग चकली (chakali recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#रेसिपीबुक #week15
#चकली
चकली आणि जिलेबी रेसिपी 1
आता भाजणीचे पीठ दळून आणणे शक्य नाही म्हणुन गव्हाच्या पिठाची हि चकली बनवली आहे. झटपट होते.

खमंग चकली (chakali recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15
#चकली
चकली आणि जिलेबी रेसिपी 1
आता भाजणीचे पीठ दळून आणणे शक्य नाही म्हणुन गव्हाच्या पिठाची हि चकली बनवली आहे. झटपट होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
7-8 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमगव्हाचे पीठ
  2. 25 ग्रॅमतांदळाचे पीठ
  3. 1 टेबलस्पूनतीळ
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1 टेबलस्पूनधने पावडर
  6. 1 टीस्पूनओवा
  7. 1 टीस्पूनहळद
  8. चवीनुसार मीठ
  9. आवशक्यतेनुसार पाणी
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    प्रथम कूकर च्या भांड्यात गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ घ्या आणि कूकर मध्ये स्टॅन्ड ठेवा, पिठावर सुती कापड झाका आणि 20 मिनिट वाफवून घ्या.

  2. 2

    आता हे पीठ चाळणीतून गाठी फोडत चाळून घ्या. त्यात मीठ, धने पावडर, हळद, तिखट,ओवा, तीळ घाला आणि थोडे थोडे पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्या.

  3. 3

    गोळा मळून झाला कि चकलीचा सोऱ्या घ्या त्याला आतून तेल लावा, गोळा छोटा घेऊन सोऱ्या मध्ये भरा.

  4. 4

    आता चकली पडून घ्या, आणि मध्यम आचेवर तळून घ्या. खमंग खुसखुशीत चकली तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

टिप्पण्या (16)

Similar Recipes