तिळ, गुळ आणि शेंगदाण्याची वडी (til gul shengdana vadi recipe in marathi)

तीळ, शेंगदाणे आणि गूळ या तिघांमध्ये असे nutrients असतात जे बर्याच आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. यांचे सेवन रोज सीमित मात्रेत केलेच पाहिजे. तर कोणी या तिघांचा समावेश करून गोड पोळ्या बनवतात किंवा कोणी लाडू बनवतात. वेगवेगळ्या पद्धतीने याचा उपयोग करून आपण काहीही बनवू शकतो, तर मी आज याच्या वड्या बनवल्या आहे, तुम्हाला पण नक्की आवडेल. बनवून बघाल खूप छान होतात . आणि बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आणि कमी वेळेत बनेल अशी आहे.

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मी इथे 1 पाव शेंगदाणे घेतले आहे, 1 पाव तीळ घेतले आहे आनि गुळाला इथे दाखवल्याप्रमाणे बारीक किस्स करून घेतला आहे
- 2
त्यानंतर शेंगदाणे आणि तीळ वेगवेगळे भाजून घ्यावे. तिळाला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावे, आणि थंड झाल्यावर शेंगदाण्याचे साल काढून घेऊन. नंतर आपले भाजून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ मिक्सि मधून जाडसर बारीक करून घ्यावे.
- 3
त्यानंतर कढई मध्ये एक चम्मच साजूक तूप आणि आपला किसलेला गुळ टाकून गुळाचे पाणी होईपर्यंत त्याला फिरवून घ्यावे, आणि त्या मध्ये आपले बारीक केलेले तीळ आणि शेंगदाणे गुळाच्या पाण्यात मिक्स करून घ्यावे वरून थोडी वेलची पूड व जाळफल पण त्या मध्ये टाकून मिक्स करावे त्याने वड्या चवदार लागतात,
- 4
त्या नंतर एका मोठ्या ताटाला तूप लावून घ्यावे व ते आपले तयार झालेलेे मिश्रण त्यात ओतावे आणि एका वाटीच्या साहाय्याने फटाफट ते मिश्रण थापून (plane) करून घ्यावे, आणि वरून आपल्या आवडीनुसार खोबरा किस्स किंवा ड्राय फ्रूट्स पण टाकू शकतो, जस की मी इथे खोबरा किस्स चा वापर केला आहे.
- 5
मग लगेच 5 मिनिटानंतर आपल्याला आवडेल त्या size च्या वड्या पाडून घ्याव्या.. बस्स अश्याप्रकारे आपल्या चविष्ट तिळगुळ आणि शेंगदाण्याच्या वड्या तयार तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही वडी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)