ज्वारी बाजरी भाकरी. (jowari bhakri recipe in marathi)

#GA4 #Week16 की वर्ड--Jowar..ज्वारी..
ज्वारीची भाकरी शरीरासाठी अतिशय पौष्टीक असून बाजरीच्या तुलनेत शीत (थंड) गुणाची, पचावयास हलकी असते. यात कर्बोदके, प्रथिने व तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी ऊर्जादायी ठरते. ज्वारीची भाकरी पचनक्रिया सुरळीत ठेवते व बद्धकोष्ठाचा त्रास कमी करते आणि मुळव्याधीचाही त्रास होत नाही..पोटाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी..acidityहोत नाही. यातील तंतुमय पदार्थ व अँटीऑक्सिडेंटमुळे लठ्ठपणा, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी व रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे सोपे जाते. नियमित आहारात ज्वारीची भाकरी घेतल्याने शरीरात अतिरिक्त चरबी (मेद) साठत नाही. ज्यांना वजन कमी करण्याची ईच्छा आहे त्यांनी तर रोज जेवणात ज्वारीचा समावेश करावा. हाडांची मजबुतीवर गुणकारी आहे.ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते. ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.लालपेशींचीवाढ होण्यासमदतहोते.गुगलस्त्रोत..
ज्वारी व बाजरी एकत्र करून हिवाळ्यात भाकरी खाव्यात.. चला तर मग गरमागरम भाकरी करु या.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम पाणी गरम करून घ्यावे त्यातच मीठ घालावे आणि यामध्ये भाकरीचे पीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे आणि 5मिनिट तसेच झाकून ठेवावे नंतर पुन्हा पाण्याचा हात लावून घेऊन पीठ मळावे आणि त्याचे गोळे करून घ्यावेत
- 2
आता परातीमध्ये भाकरीचे पीठ भुरभुरून त्यावर भाकरीच्या पिठाचा गोळा ठेवून भाकरी थापून घ्यावी.
- 3
आता तापलेल्या तव्यावर भाकरी अलगद टाकून त्यावर पाणी पसरवावे.. पाण्याची वाफ होऊन गेल्यावर समजावे की भाकरी पचली आहे मग भाकरी उलटावी आणि दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यावे नंतर परत उलटून गॅसवर डायरेक्ट भाजावी. तयार झाली आपली गरमागरम भाकरी.
- 4
एका ताटात गरमागरम भाकरीवर तूप, लोण्याचा गोळा गूळ घालून किंवा कुठलीही भाजी पिठलं कांदा मिरची याबरोबर खाण्यास सर्व्हा करा.
- 5
- 6
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)