मेथी बोंबील (methi bombil recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बोंबील गरम पाण्यात 5 मिनिट भिजवून ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. मेथी स्वच्छ धुवून घ्या व बारीक चिरून घ्या.
- 2
कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या. आलं लसूण कुटून घ्या.हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
- 3
कढई मध्ये तेल टाकून जीर, आलं लसूण टाकून थोडं परतुन घ्या. नंतर त्यात कांदा टाका व थोडं परतुन घ्या.
- 4
कांदा परतल्यावर त्यात टोमॅटो टाका व सर्व माऊ झाल्यावर लाल तिखट, हळद टाकून बोंबील टाका व थोडं शिजू द्या.
- 5
नंतर त्यात मीठ टाकून चिरलेली मेथी टाका. व पाण्याचा शिंपडा देऊन भाजी शिजू द्या.भाजी शिजल्यावर खायला घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14472762















टिप्पण्या