केळ्याचा शिरा (kelyacha sheera recipe in marathi)

आपल्या संस्कृती मध्ये गुरुपरंपरेलाला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी आपण आपल्या गुरूंना वंदन करून ,खास गोडाचा नैवैद्य बनवून साजरा करत असतो. आज मी घेऊन आले आहे गुरुपौर्णिमा स्पेशल रेसीपी केळ्याचा शिरा. आपण नेहमी सुद्धा केळं घालून रव्याचा शिरा करतोच. पण हा काही वेगळा आहे, कारण यात रव्याचे प्रमाण कमी आणि केळी जास्त आहेत. खूप छान चव लागते. नक्की करून पहा.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत तूप गरम करून त्यामध्ये मंद आचेवर रवा खमंग भाजून घ्यावा.
- 2
शेगडीवर एका बाजूला रवा भाजून घेत असताना दुसरीकडे पातेल्यात दूध व पाणी एकत्र करून दोन उकळ्या आणाव्यात. केळी सोलून घ्यावीत.
- 3
आता या खमंग भाजून घेतलेल्या रव्यामध्ये उकळून घेतलेले दूध-पाणी घालून एकजीव करून घ्यावे. लगेचच झाकण ठेवून एक वाफ आणावी.
- 4
वाफ आल्यानंतर झाकण उघडून केळी कुस्करून घालावी. यात आता साखर, वेलची पावडर घालून सर्व नीट एकजीव करून घ्यावे व झाकण ठेऊन पुन्हा एक वाफ आणावी.
- 5
आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटस् घालून गरम गरम सर्व्ह करावे.
- 6
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (8)