मिल्क पेढा (milk peda recipe in marathi)

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
नासिक

#मिल्क पेढा
#gpr
ही रेसिपी मी खास गुरुपौर्णिमा निमित्त प्रसाद म्हणून बनवली आहे.मी हा पेढा खवा वापरण्याऐवजी मिल्कपावडर वापरून बनवला आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता गोड पदार्थ आहे.

मिल्क पेढा (milk peda recipe in marathi)

#मिल्क पेढा
#gpr
ही रेसिपी मी खास गुरुपौर्णिमा निमित्त प्रसाद म्हणून बनवली आहे.मी हा पेढा खवा वापरण्याऐवजी मिल्कपावडर वापरून बनवला आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता गोड पदार्थ आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिट
१०ते१५ पीस
  1. १/४ कप पिठी साखर
  2. 1/2 कपतूप
  3. 2 टेबलस्पूनदूध
  4. सजावटी साठी केसर काडी
  5. २ कपमिल्क पावडर

कुकिंग सूचना

१० मिनिट
  1. 1

    एका नॉन स्टिक कढई मध्ये १/२ कप तूप थोडेसे गरम करून घ्या. गॅस बंद करून त्यात २ कप मिल्क पावडर,१/४ कप साखर व्यवस्थित मिक्स करा.

  2. 2

    मिश्रणामध्ये गाठ राहायला नकोय. गॅस चालू करा. लो क्लेम मध्ये थोड्या थोड्या प्रमाणात दूध मिक्स करा व मिश्रण हलवत रहा.

  3. 3

    हळूहळू मिश्रण घट्टसर होईल. जास्त मिश्रण घट्ट ही नको. मिश्रण तूप सोडायला लागल्यास गॅस बंद करा.आपले मिश्रण बरोबर झाले आहे की नाही ते पाहण्यासाठी मिश्रणाच्या मधोमध चमचा उभा ठेवा आमच्या बरोबर उभा राहिल्यास मिश्रण बरोबर आहे. मिश्रण कोमट झाल्यास तुपाचे हात लावून तसेच गोल आकारामध्ये पेढे वळा. मिश्रण पूर्ण थंड होऊ देऊ नका. पेढा ल्या आपल्या आवडी प्रमाणे तुम्ही डिझाईन बनवू शकता. मी झारीचा वापर करून त्याच्यावर डिझाईन तयार केली आहे. शेवटी त्याला आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट व केशर ने तुम्ही सजावट करू शक ता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्नेहा अमित शर्मा
रोजी
नासिक

Similar Recipes