मटार चिज करंजी (matar cheese karanji recipe in marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

#fdr - friendship day निमित्त मी कुकप्याडवर माझी पहिली रेसीपी पोस्ट करत आहे . त्या साठी माझी मैत्रीण supriya thengadi हिने मदत केली आहे .आणी म्हणुनच आमच्या दोघींच्या आवडीची मटार चिज करंजीची रेसिपी पोस्ट करत आहे.....

मटार चिज करंजी (matar cheese karanji recipe in marathi)

#fdr - friendship day निमित्त मी कुकप्याडवर माझी पहिली रेसीपी पोस्ट करत आहे . त्या साठी माझी मैत्रीण supriya thengadi हिने मदत केली आहे .आणी म्हणुनच आमच्या दोघींच्या आवडीची मटार चिज करंजीची रेसिपी पोस्ट करत आहे.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 minit
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 1 कपमटार
  3. 1 चमचाआल, लसुण,हिरवी मिरची पेस्ट
  4. 1/2 चमचाजीरे
  5. चिमुटभरहिंग
  6. 1 चमचाधने पावडर
  7. 1/2 चमचागरम मसाला
  8. 1/4 कपओला खोवलेला नारळ
  9. 1/2 चमचाहळद
  10. तेल आवश्यकतेनुसार
  11. मीठ चविनुसार
  12. साखर चवीनुसार
  13. 5चिज क्युब

कुकिंग सूचना

30 minit
  1. 1

    प्रथम मैदा घेउन त्यात चवीनुसार मीठ घालुन,दोन चमचे गरम तेल मोहन म्हणुन घालावे.मग पाणी घालुन गोळा मळुन घ्यावा.

  2. 2

    कढईत तेल गरम करुन त्यात अर्धा चमचा जीरे घाला,तडतडले की त्यात हिंग,आले+लसुण मिरची पेस्ट घाला,परता,मगहळद घाला,परतुन झाल्यावर गरम मसाला घाला,आवडत असल्यास ओल्या नारळाचा किस घाला,सगळे एकत्र करा मग एक कप मटार घालुन पाच मनीट वाफु द्या.

  3. 3

    मग वाफल्यानंतर त्यात चविनुसार मीठ,साखर घाला,परत दोन मिनीटे वाफु द्या.

  4. 4

    सारण गार होऊन द्यावे.मग त्यात चिज किसुन घालावे.

  5. 5

    मग मैदाच्या छोटा गोळा घेउन त्याची छोटी पारी लाटुन त्यात सारण भरुन करंजीचा आकार देउन गरम तेलात सगळ्या करंज्या खुसखुशित तळुन घ्याव्या.वरुन चिज घालावे.

  6. 6

    सगळ्या करंज्या तळुन झाल्या की त्यावर भरपुर चिज किसुन घालावे आणि टोमॅटो ।केचप घालावे आणि सर्व्ह कराव्या टेस्टी मटार चिज करंजी.......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

Similar Recipes