मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)

मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिकन स्वच्छ धुवून त्याला मॅरिनेटसाठी दिलेला मसाला, हळद, दही, मीठ लावून ठेवावे.सर्व खडा मसाला काढून घ्यावा, खोबरे किसून घ्यावे. दोन कांदे गॅसवर भाजून घ्यावेत.
- 2
आता सर्व खडा मसाला व खोबरे भाजून बारीक पूड करून घ्यावी. आले, लसूण, कोथिंबीर व भाजलेला कांदा यांची पेस्ट करून घ्यावी. २ कांदे फोडणीसाठी बारीक चिरून घ्यावेत.
- 3
आता एका पातेल्यात ४-५ पळ्या तेल गरम करून त्यामध्ये हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घालावा.सोनेरी रंगावर भाजून आले, लसणाचे वाटण घालावे.तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये खड्या मसाल्याचे वाटण घालून मिनिटभर परतून काळा मसाला, लाल तिखट,मीठ घालून परतावे.
- 4
आता एक खोलगट झाकण ठेवून त्यामध्ये पाणी घालावे. चिकनला आतल्या आत एक छान वाफ येवू द्यावी, वरच्या झाकणातले गरम झालेले पाणी चिकनवर घालावे, अशा दोन वाफा घ्याव्यात व आवश्यक तेवढे पाणी घालून शिजेपर्यंत उकळू द्यावे. वरून सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
- 5
चपाती, तांदळाची भाकरी, नान, रोटी कशाहीबरोबर छानच लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या