स्पॅनिश अंडी बटाटा आमलेट (Spanish anda batata Omelette recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#pe पोटॅटो अँड एग रेसिपीज कॉन्टेस्ट साठी मी Spanish Egg Potato Omelet पाककृती सादर करत आहे :) बटाटा हे असं व्यंजन आहे कि ते कोणासोबतही सामावून जातं. मग अंड्यासोबत याची chemistry कशी जुळते ते बघूया ;)

स्पॅनिश अंडी बटाटा आमलेट (Spanish anda batata Omelette recipe in marathi)

#pe पोटॅटो अँड एग रेसिपीज कॉन्टेस्ट साठी मी Spanish Egg Potato Omelet पाककृती सादर करत आहे :) बटाटा हे असं व्यंजन आहे कि ते कोणासोबतही सामावून जातं. मग अंड्यासोबत याची chemistry कशी जुळते ते बघूया ;)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटं
२ व्यक्तींसाठी
  1. 10-12काळी मिरी
  2. 2-3अंडी
  3. 2छोटे बटाटे
  4. 1चीज
  5. चवीपुरतं मीठ
  6. तेल

कुकिंग सूचना

२० मिनिटं
  1. 1

    १० -१२ काळी मिरी ची खळबट्टयात कुटून पावडर करून घेतली. २-३ अंडी फेटून घेतली.

  2. 2

    बटाट्याच्या साली काढून किसून घेतले. किस पाण्यातून एकदा निथळून काढून घेतला. cheese किसून घेतलं.

  3. 3

    पण मध्ये तेल गरम करून त्यावर बटाट्याचा किस मऊसर पडेपर्यन्त परतून घेतला. थोडं मीठ आणि काळी मिरी पावडर घातली. किस बोटात दाबून पाहायचा, मॅश झाला म्हणजे गॅस बंद करून घ्यायचा.

  4. 4

    किंचित मीठ घालायचं. मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं, कारण चीज मध्ये मीठ असतंच आणि आपण बटाट्याच्या किसात पण मीठ घातलेलं आहे. फेटलेल्या अंड्यात शिजलेला बटाट्याचा किस आणि किसलेलं चीज घालून सर्व मिश्रण फेटून घ्यायचं. जेवढं मिश्रण फेटल जाईल तेवढं ऑम्लेट fluffy होईल.

  5. 5

    पुन्हा पॅनवर तेल गरम करून घ्यायचं. त्यावर फेटलेलं सगळं मिश्रण ओतायचं. झाकण ठेवून द्यायचं. वरील बाजू सुकत आली कि परतायचं आणि दोन्ही बाजू चांगल्या शिजवून घ्यायच्या.

  6. 6

    काळीमिरी मुळे बटाटा आणि अंड्याची चव शाबूत राहते. जेवणाची रंगत वाढवायला Spanish Egg Potato Omelet तयार :)
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

Similar Recipes