आंबा डाळ (Aamba Dal recipe in marathi)

शहरातील बालपण असलं तरी गावच्या मातीशी असलेलं घट्ट नातं.... जत्रेच्या आठवणी नेहमीच ताज्या तवान्या करतं.... जत्रा म्हटली कि, मज्जाच मज्जा...!! ती रंगबिरंगी दुकानं.... झुले... साबणाचे फुगे... खेळणी... खाऊ... ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो.... आणि बरचं काही....!!
मुंबईत, दादर मधलं बालपण.... त्यामुळे मुंबई महालक्ष्मी जत्रा आणि आजोळ चिंचणी... त्यामुळे गावदेवीची जत्रा... हे दोनच जत्रेचे प्रकार जास्त आवडीचे.... त्यातही शेजार जर ब्राह्मणी धाटणीतलं असेल तर घरच्या चैत्र नवरात्र जत्रेतील *आंबा डाळ* न खाल्लेला खवय्या विरळाच....!!
चैत्र गौरीच्या महोत्सवात, महिनाभर दर शुक्रवारी केले जाणारे *कुमारीका पूजन*.... आम्हा मुलींसाठी छोटेखानी जत्राच... !! त्यात मिळणाऱ्या खाऊमध्ये... ल्हाया, ओला खजूर, कैरी पन्हे यासोबत असलेल्या *आंबा डाळ* चे.... खास आकर्षण...!!
©Supriya Vartak-Mohite

कुकिंग सूचना
- 1
भिजवलेली चणाडाळ निथळत ठेवून सर्व पाणी काढून डाळीची कोरडी भरड वाटून घ्यावी.
- 2
आता त्या वाटलेल्या डाळीवर, आलं-मिरची ठेचा, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि चिमुटभर साखर घालून ठेवावे.
- 3
एका कढईत तेल गरम करुन त्यात, फोडणी साहित्य घालून, चांगले तडतडले कि, मग त्यात वाटलेली डाळ घालावी.
- 4
डाळ चांगली मोकळी होईपर्यंत सतत परतावे आणि मग डाळ शिजून तयार झाली कि त्यात थोडा ओला नारळ व कोथिंबीर घालून मिसळावे.
- 5
आंबा डाळ सर्व्ह करताना, त्यावर कैरीचे तुकडे, नारळ, कोथिंबीर आणि कांदा गार्निश करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (5)