दही, धपाटे (dahi dhapate recipe in marathi)

#KS6
जत्रा स्पेशल
सांगली जिल्ह्यातील काळामवाडी येथे काळामा देवीची यात्रा भरते श्रावणातील मंगळवारी शुक्रवारी आणि दसऱ्यात दसऱ्याच्या दिवशी इकडे यात्रा असते देवीला दही धपाटे उसळ आणि आळूची वडी असा नैवेद्य असतो
या ठिकाणी खूप लांबून भाविक येतात कर्नाटक हुबळी अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून येथे भाविक गर्दी करतात,माहेरवाशिणी या देवीला मंगळवारी किंवा शुक्रवारी दही धपाटे याचा नैवेद्य घेऊन येतात
दसऱ्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता बाजूचा तळ्यात अंघोळ करून इथे इंगळावरती चालतात ही परंपरा खूप जुनी आहे अजूनही लोक या इंगळा वरती चालून मगच नवरात्रीचा उपवास सोडतात .
तर मी आज तुम्हाला धपाट्याची रेसिपी सांगणार आहे

कुकिंग सूचना
- 1
प्रथम लसूण हिरवी मिरची कोथिंबीर जीरे घालून मिक्सरला वाटून घ्या
- 2
तुमच्याकडे तयार धपाटे चे पीठ नसेल तरीही सर्व पीठ मिक्स करून यामध्ये वरील वाटलेले मी मिरचीचं वाटण धने जीरे पूड चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर घालून पीठ घट्ट मळून घ्या
- 3
पोळपाटावर एक स्वच्छ धुतलेला रुमाल घेऊन त्यावर गोळा घ्या आणि आणि धपाटे थापून घ्या मधे मध्ये पाण्याचा हात लावून थापा. तवा तापत ठेवा त्यावर तेल सोडा तो रुमाल उचला आणि तव्यावर टाका त्यावर बोटांनी होल करा पाण्याचा हात लावून रुमाल अलगत काढून घ्या तेल सोडा आणि त्यावर झाकण ठेवा दोन मिनिटांनी उलटल्याने धपाटे उलटून दुसऱ्या बाजूने भाजून घ्या
- 4
दोन मिनिटांनी बाजू उलटून घ्या आणि कडेने तेल सोडा. दही धपाटे भात त्यावर दह्यात दही, वडी आणि उसळ असा नेवेद्य भरतात
- 5
गरमागरम धपाटे खायला द्या
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)