मुग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2
Week2
आज मी तुमच्या बरोबर रेसिपी मॅक्झिन साठी मुग डाळ हलवा ही रेसिपी शेअर करतेय.
मुग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#cpm2
Week2
आज मी तुमच्या बरोबर रेसिपी मॅक्झिन साठी मुग डाळ हलवा ही रेसिपी शेअर करतेय.
कुकिंग सूचना
- 1
मुग डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यानंतर ती पाण्यामध्ये साधारण चार ते पाच तास भिजत ठेवावी. चार ते पाच तासानंतर ती व्यवस्थित भिजते मग त्यातील पाणी काढून घ्यावे.
- 2
आता ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. एका कढाई मध्ये तू घालावे तू थोडेसे गरम झाल्यावर त्यामध्ये रवा
व बेसन घालून दोन मिनिटे परतून घ्यावे. मग त्यामध्ये आपण वाटलेले मिश्रण घालून एकसारखे परतून घ्यावे. मुग डाळ हलवा बनवण्यासाठी तूप थोडे जास्तच लागते. - 3
हे सर्व मिश्रण मंद आचेवर एक सारखे परतावे हळूहळू त्याचा कलर बदलू लागतो व ही डाळ मोकळी व्हायला सुरुवात होते. एकीकडे थोड्याशा दुधामध्ये केशर काड्या घालून केशर दूध बनवून घ्यावे. बदाम मध्ये केशर दूध व दोन कप दूध ॲड करावे व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यावी
- 4
दूध घालून परतल्यावर आता त्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत. आता हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर एक सारखे परतून घ्यायचे आहे आता जोपर्यंत त्याला छान कलर येत नाही. मग त्यामध्ये वेलची पूड घालावी. ही सगळी प्रोसेस आपल्याला एकदम कमी आचेवर करायचे आहे म्हणजे मुग डाळ हलवा खमंग आणि टेस्टी बनतो
- 5
आपला मुग डाळ हलवा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे त्यावर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या (2)