वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)

Rajashri Deodhar @RBD12072012
#cpm5
मॅगझीन week5
ही भाजी शक्यतो लोखंडी कढईत करावी मस्त होते.
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5
मॅगझीन week5
ही भाजी शक्यतो लोखंडी कढईत करावी मस्त होते.
कुकिंग सूचना
- 1
कांदा मिरची आलं लसूण मिरची चिरून घ्या.कढईत तेल गरम करून त्यात मोहरी मेथी दाणे हिंग हळद कडीपत्ता मिरची कांदा थोडे मीठ लसूण आलं घालून बारीक गॅसवर एकत्र परतावे.सालासकट बटाटा चिरून घ्या आणि कढईमध्ये घालावा त्यावर लाल तिखट गरम मसाला घालून एकत्र करावे.
- 2
झाकण ठेवून झाकणावर पाणी घालून 4-5 मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढावी.वांगी चिरून घ्यावी आणि कढईमध्ये घालून त्यावर धने जीरे पावडर चवीनुसार मीठ घालून एकत्र करावे.
- 3
झाकणावरील पाणी घालून एकत्र करावे आणि भाजी शिजवावी चिरलेला टोमॅटो गूळ कोथिंबीर घालून भाजी एकत्र करावी आणि 2-3 मिनिटांनी गॅस बंद करावा चिरलेली कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15284534









टिप्पण्या (5)