कोलीम (kolim recipe in marathi)

The Bassein Kitchen
The Bassein Kitchen @thebasseinkitchen

वसई च्या किनारपट्टीच्य भागात मिळणाऱ्या कोलिम म्हणजे Tiny Shrimp हा एक मासळीचा प्रकार आहे. रेसिपी- अल्बिना फर्नांडिस, वसई. #shaboiboyz

कोलीम (kolim recipe in marathi)

वसई च्या किनारपट्टीच्य भागात मिळणाऱ्या कोलिम म्हणजे Tiny Shrimp हा एक मासळीचा प्रकार आहे. रेसिपी- अल्बिना फर्नांडिस, वसई. #shaboiboyz

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिट
  1. 3पांढरे कांदे (उभे चिरलेले)
  2. 2टोमॅटो (बारीक चिरलेले)
  3. 2मोठे चमचे तेल
  4. 2 टेबलस्पूनआले व लसूण पेस्ट
  5. 1 कपपाणी
  6. 2 टेबलस्पूनबॉटल मसाला(भाजला मसाला)
  7. 2हिरव्या मिरच्या(उभ्या कापून)
  8. चवीपुरती मीठ
  9. 1/2 टीस्पूनचीचेचे पल्प (१/२ वाटी पाण्यात थोडी चीच भिजवून घ्यावे)
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 1 वाटीताजा कोलीम

कुकिंग सूचना

४५ मिनिट
  1. 1

    सर्वात प्रथम एका भांड्यात तेल घालून गरम होऊ द्या. त्यात मिरची व कांदा घालून व्यवस्थित शिजवा.

  2. 2

    कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो घाला व ५ मिनिट शिजवा.

  3. 3

    चवी साठी मीठ घाला व आले लसूण पेस्ट घालून व्यवस्थित शिजवा.

  4. 4

    कोलीम पाण्यात भिजवा व स्वच्छ कपड्यातून गाळून घ्या व भांड्यात घालून व्यवस्थित मिसळा.

  5. 5

    ह्या मिश्रणात बॉटल मसाला घालून व्यवस्थित परतून घ्या.

  6. 6

    बॉटल मसाल्याचा रंग गाढ होईल व तेल सुटेल तेव्हा या मिश्रणात अर्धा वाटी पाणी घाला व झाकण देऊन त्यावर पाणी ओता व मंद आचेवर १० मिनिट कोलीम करी शिजवा.

  7. 7

    अधून मधून करी परतून घ्यावे. व मग त्यात चिंचेचे पाणी घालून पुन्हा झाकण देऊन शिजवा.

  8. 8

    करी व्यवस्थित शिजल्यावर वरून बारीक कोथिंबीर घालून आच बंद करा

  9. 9

    चटपटीत, तिखट, आंबट अशी ही करी तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करा. (हा पदार्थ लोणच्य सारखा थोड्या प्रमणात खावा.)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
The Bassein Kitchen
The Bassein Kitchen @thebasseinkitchen
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes