मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

#cpm5

आज आमची मैत्रीण दीपा नायडू जी आज हयात नाही 😪😪 तिच्या स्मरणार्थ ही रेसिपी मी पोस्ट करीत आहे. तिची आई व ती आम्ही तिच्या घरी गेलो की नेहमी हे मिक्स डाळीचे वडे आम्हाला गरम गरम खायला द्यायच्या.
Luv u always Dearest deep(a)

मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)

#cpm5

आज आमची मैत्रीण दीपा नायडू जी आज हयात नाही 😪😪 तिच्या स्मरणार्थ ही रेसिपी मी पोस्ट करीत आहे. तिची आई व ती आम्ही तिच्या घरी गेलो की नेहमी हे मिक्स डाळीचे वडे आम्हाला गरम गरम खायला द्यायच्या.
Luv u always Dearest deep(a)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्राममिक्स डाळ (उडीद, चणा, मूग, तूर)
  2. 4हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या
  3. 2कांदे लांबे चिरलेले
  4. 6-7कढीपत्त्याची पाने
  5. 6-7काळी मिरीचे दाणे
  6. 4-5पाकळ्या लसूण
  7. गरजेनुसार पाणी
  8. 2-3 चमचेबेसन
  9. 2-3 चमचेतांदळाचे पीठ
  10. चवीपुरता मीठ
  11. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्व डाळी आदल्या रात्री भिजत घाला. कमीत कमी तीन ते चार तास डाळी भिजू द्याव्या.

  2. 2

    मिक्सरच्या भांड्यात सर्व डाळी, लसणाच्या पाकळ्या व काळी मिरीचे दाणे थोर वाटून घ्या.

  3. 3

    कांदा लांबा व मिरच्या बारीक चिरून घ्या. कांदा, कढीपत्ता व मिरच्या वरील डाळीच्या मिश्रणात मिक्स करा.

  4. 4

    त्यात दोन ते तीन चमचे बेसन व तांदळाचे पीठ घाला व एकजीव करा. गरज लागल्यास पाणी घालून थोडे सैलसर भिजवावे.

  5. 5

    कढई मध्ये तेल गरम करून घ्या. वरील मिश्रणाचे थोडे मोठे गोळे करून हाताच्या बोटांवर थापावे. त्याला मध्ये भोक करा म्हणजे तळायला अजून चांगली मदत होते.

  6. 6

    दोन्ही बाजूने सोनेरी रंगाचे झाले की जाळीच्या टोपलीत काढा.

  7. 7

    सॉस किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
रोजी
Mumbai

Similar Recipes