काळा चणा सलाड /काळा चणा चाट (kala chana salad recipe in marathi)

#kdr
हे काळा चणा सलाड /काळा चणा चाट मी नेहमी व्यायाम करून आल्यावर खाण्यासाठी करते यामुळे जास्त वेळ एनर्जी राहते लवकर भूकही लागत नाही तसेच काळा चणा वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहेच आणि हेल्दी ऑप्शन आहे.

कुकिंग सूचना
- 1
काळा चणा हळद हिंग मीठ पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या आणि यातील पाणी बाजूला काढून ठेवावे. कढईमध्ये तेल गरम करून त्यात जीरे कढीपत्ता उडदाची डाळ मिरची घालून परतावे त्यावर शिजवून घेतलेले काळा चणा तिखट धने पावडर आमचूर पावडर घालून एकत्र मिक्स करावे.
- 2
आता गॅस बारीक करुन त्यात बेसन पीठ काळा चणा शिजवण्यासाठी वापरलेलं पाणी लिंबू रस घालून एकत्र करावे आणि झाकण ठेवून 5-7 मिनिटे शिजवून गॅस बंद करावा.
- 3
कांदा टोमॅटो काकडी कोथिंबीर पुदिन्याची पाने चिरून घ्यावी गाजर किसून घ्या आणि कढईमध्ये घाला वरून जीरे पावडर चाट मसाला लिंबू रस घालून एकत्र करावे. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून चिंचेची चटणी कोथिंबीर आणि शेव घालून काळा चना चाट/ चना सलाड सर्व्ह करावे.(शेव चिंचेची चटणी न घालता सर्व्ह केले तरी चालते.)
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)