स्प्राऊट्स व्हेजी रोल (sprouts veggie roll recipe in marathi)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

#kdr कडधान्य स्पेशल....
कडधान्य अनेक प्रकारचे आहेत .मोड आणल्यामुळे ते पचायला हलके होतात. कडधान्य हे अत्यंत पौष्टिक असतात. त्यातून भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व व प्रोटिन्स मिळतात. आरोग्यास तर खूपच छान तर अशीच कडधान्यांची व्हेजी रोल्स बनवले चला तर पाहुयात कसे बनवायचे ते...

स्प्राऊट्स व्हेजी रोल (sprouts veggie roll recipe in marathi)

#kdr कडधान्य स्पेशल....
कडधान्य अनेक प्रकारचे आहेत .मोड आणल्यामुळे ते पचायला हलके होतात. कडधान्य हे अत्यंत पौष्टिक असतात. त्यातून भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व व प्रोटिन्स मिळतात. आरोग्यास तर खूपच छान तर अशीच कडधान्यांची व्हेजी रोल्स बनवले चला तर पाहुयात कसे बनवायचे ते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मिनिट्स
3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमजाड रवा
  2. 50 ग्रॅमतांदळाचे पीठ
  3. 1 टीस्पूनमूग
  4. 1 टीस्पूनचवळी
  5. 1 टीस्पूनवाटाणे
  6. 1 टीस्पूनहरभरे
  7. 100 ग्रॅममटकी
  8. 1 टेबलस्पूनगाजर
  9. 1 टेबलस्पूनसिमला मिरची
  10. 1 टेबलस्पूनटोमॅटो
  11. 1कांदा
  12. 7-8लसूण पाकळ्या
  13. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  14. 1/4 टीस्पूनहळद
  15. 1/2 टीस्पूनतिखट
  16. 1/4 टीस्पूनकाळा मसाला
  17. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  18. 1 वाटीताक व पाणी
  19. 4कढीपत्ता पाने
  20. 1/2 टीस्पूनलिंबूरस
  21. चवीपुरती साखर व मीठ

कुकिंग सूचना

50 मिनिट्स
  1. 1

    प्रथम सर्व कडधान्य स्वच्छ धुऊन सात ते आठ तास भिजत ठेवा. नंतर ते उपसून निथळत ठेवा. एका कपड्यात ही कडधान्य टाकून सात ते आठ तास बांधून ठेवा.. म्हणजे त्याला चांगले मोड येतात. व हलकी होतात

  2. 2

    डोसा बॅटर - एका पातेल्यात रवा, तांदळाचे पीठ,चवीपुरते मीठ,ताक व पाणी टाकून दोन-तीन तास भिजत ठेवा. सिमला मिरची, गाजर,कांदा,टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

  3. 3

    उसळ - गॅस वर एका कढईत दीड टेबलस्पून तेल ठेवा. ते तापल्यावर मोहरी जीरे टाका. तडतडल्यावर त्यात कढीपत्ता, कांदा,ठेचलेला लसूण,टाकून परतून घ्या.

  4. 4

    नंतर स्टेप बाय स्टेप चिरलेली सिमला मिरची, गाजर टाकून परता. शेवटी टोमॅटो टाका. मऊशार झाल्यावर त्यात हळद, तिखट, गरम मसाला, काळा मसाला, कोथिंबीर, मीठ टाकून चांगले परता. वरतून लिंबूरस, चवीपुरती साखर, टाकून दणदणीत वाफ येऊ द्या व झाकून ठेवा.

  5. 5

    हे मऊशार झालेले मिश्रण स्मॅश करून घ्या. म्हणजे डोश्याचे रोल केल्यानंतर बाहेर येणार नाहीत.

  6. 6

    निर्लेप तव्यावर नेहमी डोसा करतो त्याप्रमाणे डोसा करा. तयार डोसा डिशमध्ये काढल्यावर प्रथम त्यावर सगळीकडे सॉस लावून घ्या. नंतर तयार स्प्राऊट्स त्यावर पसरवून हळुवार त्याचा रोल करा. नंतर कटरने चौकोनी तुकडे कट करा. डेकोरेट करून सर्व्ह करा. हवा असल्यास सॉस किंवा ग्रीन चटणी आपण घेऊ शकतो.

  7. 7

    अशाप्रकारे स्प्राऊट्स व्हेज रोल खास लहान मुलांच्या डब्यासाठी व मोठ्यांसाठी तयार.... चवीला तर भन्नाट लागतात व त्यातून भरपूर जीवनसत्व व प्रोटिन्स मिळतात आरोग्यास खूपच छान. तर असे आगळे वेगळे कडधान्याचे रोल बनवले.चला टेस्ट करुयात....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mangal Shah
Mangal Shah @mangal51
रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

Similar Recipes