मटण खिमा आणि पाव (mutton kheema pav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मटण खिमा मध्ये एक टेबलस्पून मिक्स मसाला, अर्धा कप दही, एक टीस्पून हळद, चवीनुसार मीठ आणि खडा मसाला घालून किमान तासभर मॅरीनेट होऊ द्या... मी इथे वाडवळी मसाला वापरला आहे... तुम्ही रोजच्या वापरातील कोणताही मिक्स मसाला वापरू शकता...
- 2
मॅरिनेट केलेला खिमा प्रेशर कुकर मध्ये, अगदी लहान आचेवर, एकही शिटी होऊ न देता वीस मिनिटे शिजवा...
शिजल्यानंतर खिम्याचे थोडे गठ्ठे होतील ते मोडून घ्या... शिजवताना अजिबात पाणी घालू नका मटणाचं आणि दह्याचं पाणी सुटतं... - 3
उरलेल्या अर्ध्या कप दह्यामध्ये मटण मसाला, काश्मिरी लाल तिखट, एक टेबलस्पून मिक्स मसाला, एक टीस्पून हळद घालून मिसळून घ्या... मसाल्याचं प्रमाण तिखट खायच्या सवयीनुसार कमी-जास्त करा...
- 4
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा घालून परतून घ्या... कांदा थोडा सॉफ्ट झाला की त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट घालून परतावे... मग त्यात दह्यामध्ये मिसळलेले मसाले घालावे...
- 5
थोडे पाणी आणि शिजवलेला खिमा घालून आवश्यक ती कन्सिस्टन्सी पर्यंत येई पर्यंत शिजवून घ्या...
- 6
आवडत असेल तर वरून चिरलेली ताजी कोथिंबीर घाला...
- 7
तयार खिमा कांदा, लिंबू आणि पावा जोडीला सर्व्ह करावा...
Keywords
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या