समोसा (Samosa recipe in marathi)

Supriya Vartak Mohite @SupriyAmol
समोसा (Samosa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैद्यामधे डालडा मिसळून, साधारण घट्टसर कणिक मळून घ्यावे आणि अर्धा तास झाकून ठेवावे.
- 2
समोसा स्टफिंग बनवण्यासाठी:
१. तेल गरम करुन त्यात जीरे व चिरलेला कांदा परतून घ्यावा.
२. मग त्यात, मटार आणि पावडर मसाले घालून २-३ मिनीटे परतून घ्यावे.
३. आता त्यात उकडलेले बटाटे हाताने स्मॅश करुन मिसळावे. - 3
नंतर गॅस बारीक करुन २-३ मिनीटे झाकून बटाटे शिजवावे.
मग गॅस बंद करुन त्यात लिंबू रस आणि कोथिंबीर मिक्स करुन मिश्रण थंड करावे. - 4
आता मळलेल्या कणकेच्या मैदा-कॉर्न फ्लोर पिठी घेऊन जाडसर पोळ्या लाटून मध्यभागी कापून ठेवाव्यात.
- 5
खालील विडियो मध्ये दाखवल्याप्रमाणे स्टफिंग भरुन समोसे तयार करावे.
- 6
कढईत तेल गरम करुन त्यात १ किंवा २ समोसे गोल्डन ब्राऊन तळावे आणि चटणी-सॉस सोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15915521




















टिप्पण्या (2)