दाल तडका (Dal tadka recipe in Marathi)

झटपट आणि रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका ची रेसिपी चला तर पाहूया...
दाल तडका (Dal tadka recipe in Marathi)
झटपट आणि रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका ची रेसिपी चला तर पाहूया...
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गॅस मध्ये जितक्या प्रमाणात तूरडाळ घ्या तितक्या दुप्पट प्रमाणात पाणी घालून डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी.
- 2
डाळ शिजून झाली की रवीने घुसळून घ्यावी आणि आता गॅसवर एका पॅनमध्ये तीन चमचे तेल घ्यावे. तेल तापले की त्यामध्ये मोहरी टाकावी मोहरी तडतडली नंतर त्यामध्ये जीरे घालावे जीरे छान कढीपत्त्याची पाने घालावी आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घ्यावा
- 3
त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालावा व्यवस्थित शिजवून घेतलेला मिश्रणामध्ये मसाल तिखट हळद हिंग हे सर्व घालावे पण ते थोडे कमी प्रमाणात घालावे
- 4
नंतर त्यामध्ये शिजलेली तूरडाळ घालावी आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मीठ घालून छान ढवळून घ्यावी आणि एक उकळी येऊ द्यावी त्यानंतर गॅस बंद करावा आणि दुसऱ्या एका लोखंडाच्या पळी मध्ये थोडेसे तेल घेऊन त्यावर अर्धा चमचा तिखटाची आणि लाल सुक्या मिरच्यांची वरून फोडणी घालावी.
- 5
तयार आहे टेस्टी दाल तडका जो गरम गरम भाताबरोबर तुम्ही सर्व्ह करू शकता...
Keywords
Similar Recipes
More Recipes



टिप्पण्या