पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR
HOLI RECIPES
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम डाळ स्वच्छ धुवून घ्यावी व कुकर मध्ये पाणी घालून 3-4 शिट्ट्या काढून व 5-7 मिनिटे कमी आचेवर शिजवून घ्यावी.
- 2
कुकर गार झाल्यावर डाळ चाळणीत घालून कट गाळून घ्यावा. नंतर डाळी मध्ये गुळ व साखर घालून छान शिजवावे. मिश्रण घट्ट व्हायला लागले की गॅस बंद करावा. पुरण यंत्रात पुरण बारीक करून घ्यावे. बारीक झाल्यावर वरून वेलदोडा, जायफळ पूड,केशर घालून नीट एकत्र करुन घ्यावे.
- 3
एका परातीत कणीक, मैदा, मीठ व तेल घालून सैलसर पीठ भिजवून घ्यावे व 1-2 तास मुरू द्यावे.
- 4
पीठ मुरल्यावर तेल लावून छान मळून घ्यावे.नंतर छोटा गोळा करून त्यात पुरण भरून हलक्या हाताने लाटून घ्यावे व पोळी तव्यावर खरपूस भाजून घ्यावी. भरपूर तूप घालून मऊ लुसलुशीत पुरणपोळी सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16082059





टिप्पण्या