पुरणाचे कडबू (Puranache Kadbu Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणाडाळ स्वच्छ धुऊन त्यात पाणी, साजूक तूप व किंचित हळद घालून कुकरमध्ये शिजवून घेतली. त्यात गुळ घालून पुरण शिजवून घेतले व केशर वेलची जायफळ पूड मिक्स करून शिजत असतानाच ब्लॉंडर फिरवले.
- 2
कणिक मैद्याच्या चाळणीने चाळून त्यात मैदा व चवीपुरते मीठ मीक्स केले आणि पाणी घालून सैलसर गोळा तेलाने मळून घेतला.
- 3
आता कणकेच्या गोळ्यातील लहान गोळा घेऊन त्याची पारी लाटून त्यात मध्यभागी पुरणाचा गोळा ठेवून करंजीचा आकार दिला. व साईडला फोकने डिझाईन केले.
- 4
असे सर्व कडबू तयार करून ग्रिसींग केलेल्या चाळणीवर ठेवून इडली पात्रात वाफवून घेतले.
- 5
डिश मधे ठेवून साजुक तुपा बरोबर सर्व्ह केले.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16206273














टिप्पण्या