कैरीपन्ह आईस्क्रीम (Kairi Panna Vegan Icecream Recipe in Marathi)

#KKR
कैरीचे भरपूर पदार्थ करून झाले आणि मग केलेला हा प्रयोग. कैरीपन्ह चा गर वापरून केलेल आईस्क्रीम. ह्यात साध दुध न वापरता नारळाच दुध व सोललेले बदाम वापरलेत. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीच हे आईस्क्रीम छानच लागल.

कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य मोजून घ्यावे. पुदान्याचे पान पाणी घालून पेस्ट करून ती गाळुन घ्यावी.
- 2
मिक्सरच्या भांड्यात सोललेले बदाम व थोडे नारळाचे दुध घालून बारिक पेस्ट करून घ्यावी.
तयार बदामाच्या मिश्रणात ऊरलेल नारळाच दुध घालून फिरवून घ्यावे.
आता मिश्रणात साखर घालून फिरवून घ्यावे. - 3
तयार मिश्रणात कैरी पन्ह्याचा गर,विलायची पुड,मीठ घालून परत फिरवून घ्यावे.
तयार मिश्रणात पुदिन्याचा रस घालून हलवून मिश्रण भांड्यात ओतून 1 तास फ्रीझरमधे ठेवाव. - 4
थोडस सेट होत आलेल आईस्क्रीम ब्लेंडरने परत फिरवून घ्यावे. आता तयार आईस्क्रीम एका airtight डब्यात घालून 7-8 तास सेट करायला ठेवावे.
- 5
तयार आईस्क्रीमचे स्कुपरने स्कुप काढून सर्व्ह करावे. थंडगार थोडस आंबटगोड आणि पुदिन्याची चव असलेल्या आईस्क्रीमचा आनंद घ्यावा. #KKR
Keywords
Similar Recipes
More Recipes
- गाजर कैरी कोशिंबीर (Gajar Kairi Koshimbir Recipe In Marathi)
- तांदळाच्या पिठाची शेव (Tandulachya Pithachi Shev Recipe In Marathi)
- कैरीचे झटपट चटकदार लोणचे (Kairiche Jhatpat Lonche Recipe In Marathi)
- चिंचवणी (Chinchavani Recipe In Marathi)
- कच्चे आम की खट्टी मीठी लौंजी.(Kacche Aam ki Launji Recipe In Marathi)

टिप्पण्या (3)