झणझणीत मसाला ढेमसे (विदर्भ स्टाईल) (Masala Dhemse Bhaji Recipe In Marathi)

#BKR
आमच्या विदर्भात मस्त झणझणीत तर्री वाल्या भाज्यांची क्रेझच आहे,सगळ्यांनाच या मस्त झणझणीत भाज्या आवडतात,,,त्यातल्या त्यात तर सिझनल ढेमसाची झणझणीत भाजी म्हणजे क्या बात.......
चला तर पाहुया याची रेसिपी....

कुकिंग सूचना
- 1
प्रथम ढेमसे स्वच्छ धुवुन त्याला वरील बाजुने कापुन आतुन बिया काढुन पोखरुन घ्या.आणि गरम पाण्यात त्यांना आठ,दहा मिनीट वाफवुन घ्या.
- 2
आता या मधे भरण्याचा मसाला करुन घेउ,त्यासाठी एका पॅन मधे बारीक चिरलेला कांदा परतुन घ्या. मग त्यात खोबर्याचा किस घालुन परता.मग हळद,तिखट,धणेपुड,एक चमचा खसखस,काजु,किसमीस घालुन आणि चवीनुसार मीठ घालुन मसाला परतुन घ्या.गार होउ द्या.मसाला वाफवलेल्या ढेमसांमधे भरुन घ्या.
- 3
आता याच्या ग्रेव्हीचा मसाला करुन घ्या.त्यासाठी दोन कांदे,टोमॅटो,लवंग,मीरे,आले लसुण,खसखस सगळे छान तेलात परतुन याचा मसाला वाटुन घ्या.
- 4
आता कढईत तेल गरम करुन या मधे वाटलेला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतुन घ्या.या मधे हळद,तिखट,वर्हाडी मसाला,गरम मसाला घालुन छान परता.व मग भरलेले ढेमसे घालुन पाच,सात मिनीट शिजु द्या.
- 5
आता या मधे आवश्यक तेवढे पाणी घालुन रस्सा करुन घ्या.चवीनुसार मीठ घाला,उकळी येउ द्या.गरम गरम मसाला ढेमसे तयार आहेत.वरुन कोथिंबीर घाला.
- 6
मस्त झणझणीत मसाला ढेमसे पराठ्यांबरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (9)