लाल भोपळ्याची भाजी (Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)

#BKR लाल भोपळ्याची भाजी विदर्भातील भागात मोठ्या प्रमाणावर बनवली जाते.महालक्ष्मी, गणपती प्रसादात आवर्जून बनवतात भोपळा हा शरीरास उपयुक्त असा पदार्थ आहे
लाल भोपळ्याची भाजी (Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
#BKR लाल भोपळ्याची भाजी विदर्भातील भागात मोठ्या प्रमाणावर बनवली जाते.महालक्ष्मी, गणपती प्रसादात आवर्जून बनवतात भोपळा हा शरीरास उपयुक्त असा पदार्थ आहे
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम भोपळा साल काढून घ्यावा नंतर त्याचे मोठे मोठे चौकोनी काप करावेत आता मसाल्यासाठी शेंगदाणे खोबरे तीळ सर्व भाजून घ्यावे मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्यावे आता पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात कांदा लसूण आले यांची पेस्ट करून घ्यावी
- 2
कढईत तेल गरम करावे आणि त्यात खडा मसाला म्हणजेच लवंग दालचिनी वेलची चक्रीफुल घालून घ्यावे त्यानंतर त्यात कांदा लसणाची पेस्ट घालावी आणि मसाला चांगला परतावा
- 3
मसाला भाजत आला की त्यात लाल तिखट हळद मीठ घालून घ्यावे चांगले परतावे खोबरे तीळ आणि शेंगदाण्याचे वाटण घालून पुन्हा एकदा चांगले परतावे आणि थोडे थोडे पाणी घालून मसाला सतत हलवत रहावे एकदा का मसाल्याला तेल सुटू लागले की त्यात भोपळ्याच्या फोडी घालाव्यात आणि परतून घ्याव्यात
- 4
आता आवश्यक तेवढी शिजण्यास पाणी घालावे आणि भोपळा चांगला शिजू द्यावा सर्वात शेवटी कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी
Similar Recipes
-
लाल भोपळ्याची भाजी (lal bhopalyachi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात गणपती च्या दिवसात आवर्जून केली जाते ती लाल भोपळ्याची भाजी.नावडतीच्या भाजांमधील एक भाजी म्हणजे लाल भोपळा. अनेक ठिकाणी याला डांगर किंवा तांबडा भोपळा असं म्हणतात. ही भाजी शरीरासाठी गुणकारी असून त्याचे अनेक फायदे आहेत.म्हणून या भाजी चा आहारात नक्की समावेश करावा. Poonam Pandav -
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week-21-आज मी इथे गोल्डन अप्रन मध्ये दुधी भोपळा हा शब्द घेऊन दुधी भोपळ्याची भाजी बनवली आहे. Deepali Surve -
लाल भोपळ्याची भाजी
लाल भोपळा ही भाजी खूप गुणकारी आहे.आहारामध्ये याचा नेहमी समावेश करावा. साल न काढता भाजी केल्यास त्याचे खूप फायदे आहेत. आशा मानोजी -
लाल भोपळ्याची भाजी (lal bhopalyachi bhaji recipe in marathi)
"लाल भोपळ्याची भाजी"आज वेगळ्या पद्धतीने हिरवी मिरची लसूण घालून भाजी बनवली खुप छान टेस्टी झाली होती.. लता धानापुने -
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhoplyachi bhaji recipe in marathi)
दुधी भोपळ्याची भाजी:-दुधी भोपळा आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे .यात कॅल्शियम ,लोह ,खनिजे ,आहेत .सकाळ-संध्याकाळ रस पिल्याने हृदयविकार कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते . सर्वात महत्त्वाचे वजन कमी करण्यास उपयुक्त पचनक्रिया चांगली राहते rucha dachewar -
लाल भोपळ्यांची भाजी (Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
#BKR लाल भोपळा हा उपवासाला ही चालतो व त्याची उपवासाला न चालणारी भाजी करु शकतो. Shobha Deshmukh -
दुधी भोपळ्याची भाजी (Dudhi Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
दुधी भोपळा खूप पोष्टीक असतो. आज मी मूंग दाल घालून दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे. चला तर बनवू दुधी भोपळ्याची पोष्टिक भाजी. SHAILAJA BANERJEE -
उपवासाची भोपळ्याची भाजी (bhoplyachi bhaji recipe in marathi)
#nrr भोपळ्या मध्ये अ आणि क जीवनसत्वाचे प्रमाण जास्त प्रमाणात असते भोपळ्याच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते डोळ्यांचे आरोग्य सुधारते .भोपळा मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.तसेच भोपळा हा चवीला गोडसर असला तरी मधुमेहामध्ये हा खूप फायदेशीर आहे भोपळ्याच्या सेवनाने भुकेवर नियंत्रण मिळविता येते . चला तर मग पाहूया या लाल भोपळ्याची सहज सोपी आणि पटकन होणारी रेसिपी Ashwini Anant Randive -
लाल भोपळ्याची भाजी (Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
#BKRउन्हाळ्यात ठराविकच भाज्या पूर्वी मिळत असत.त्यातील बाराही महिने सदाबहार मिळणारी अशी भाजी म्हणजे परसदारी मिळणारा भोपळा.आमच्या गावी घरातल्या कोनाड्यात याची जागा होती.नाही मिळाली भाजी तर हा लाल भोपळा उर्फ काशीफळ हेच कामी यायचे.एकदा भोपळा फोडला की मग त्याची वाटावाटी आणि उरलेला मग घरात भाजीसाठी,भरतासाठी किंवा भोपळघारग्यांसाठी!लाल भोपळ्याला अंगचाच गोडसरपणा असतो.केशरी-पिवळा सुखावह रंग,वरच्या जाळीदार आवरणात लपलेल्या बिया,कठीण साल असं याचं रुप...अगदी सात्विक,आणि म्हणूनच उपासाला सुद्धा चालणारा हा भोपळा.भरपूर फायबर्सचा स्त्रोत.वजन कमी करणे,डोळ्यांचे आरोग्य सुधारणे,पचनक्रिया सुधारण्यासाठी,रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि मधुमेहींसाठी खास असा हा आरोग्यवर्धक भोपळा....बऱ्याच जणांना आवडत नसला तरी अधूनमधून याची भाजी खायला हवीच! Sushama Y. Kulkarni -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#triआज मी केलीये लाल भोपळ्याची खीर, भोपळा हा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,श्रावण महिन्यात अनेक उपवास येतात,आपण रोज नवीन पदार्थ करण्याचा प्रयत्न करतो,झटपट होणार प्रकार म्हणजे खीर. Pallavi Musale -
दुधी भोपळ्याची रस्सा भाजी (Dudhi bhoplyachi rassa bhaji recipe in marathi)
#Healthydietदुधी भोपळा ही चांगली भाजी आहे. हे खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. आणि कोणत्याही प्रकारात शिजविणे सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
खमंग लाल भोपळ्याची भजी (lal bhoplyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week11# कीवर्डस् मधून लाल भोपळा हावर्ड शोधून ही रेसिपी बनवली आहे. Gital Haria -
लाल भोपळ्याची भाजी(laal bhoplyachi bhaaji recipe in marathi)
मला दुधी भोपळ्याची भाजी आवडते तशीच लाल भोपळ्याची पण खूप आवडते.आई अगदी सोप्या पद्धतीने करते.तशीच मला आवडते.वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे घटक वापरून निरनिराळ्या पद्धतीने ही भाजी करतात. Preeti V. Salvi -
"लाल भोपळ्याची भाजी" (laal bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनर#शनिवार#डिनर प्लॅनर मधील दुसरी रेसिपी "लाल भोपळ्याची भाजी" लाल भोपळ्याचे नाव काढले की लगेच आठवतात भोपळ्याचे घारगे,पण प्लॅनर मध्ये भाजी होती, म्हणून भाजी बनवली..अशी साध्या सोप्या पद्धतीने केलेली भाजी सुद्धा अतिशय चविष्ट लागते.. चला तर सोपी रेसिपी बघुया.. लता धानापुने -
लाल भोपळ्याची भाजी (laal bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लँनर #शनिवार की वर्ड-- भोपळा भाजी भोपळा म्हटला की माझ्यासमोर दुधीभोपळा ऐवजी नेहमी लाल भोपळाच येतो.. याला कारण की आपली लहानपणीची चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ची गोष्ट. या गोष्टीने मनात घर करून ठेवले आहे .गोष्टी मधली म्हातारी लेकीकडे जाऊन तूप रोटी खाऊन चांगली जाडजूड होऊन परत यायला निघते तिच मुळी लाल भोपळ्यात बसून.. तर अशा ह्या लाल भोपळ्याने म्हातारीचे वाघ आणि कोल्ह्यापासून रक्षण केले होते. आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारणे वजन कमी करणे ते डायबिटीस लो बीपी कॅन्सर यासारख्या असाध्य रोगांंपासून म्हणजेच या जंगली भयानक आजारांपासून लाल भोपळा आपले देखील रक्षण करतो. त्यामुळे लाल भोपळा आपण खाणे मस्टच. कोणी लाल भोपळ्याची भाजी करून खा आणि सांबार करा कोणी भरीत करा कोणी घारगे करा कोणी खीर करा पण काहीतरी करून लाल भोपळा पोटात जाऊद्या आणि मुलांना पण खायला द्या कारण मुलांना खाण्याच्या सवयी लहानपणापासूनच लावल्या पाहिजेत नाहीतर मोठेपणी ते खवय्यै कसे होणार .आपल्या खाद्यसंस्कृतीचा आनंद कसा लुटणार यासाठी लहान वयातच खाद्य संस्कार होणे महत्त्वाचे आहे. चवीनं खाणार त्याला देव देणार असं म्हटलेलं आहे ..म्हणून पु लं म्हणतात तसे खाण्यासाठी खाणारा तो खवैय्या कसला... कारण शेवटी खाण्यासाठी जन्म आपुला आणि या खाण्यावर शतदा प्रेम करावे अशाच एक एक खमंग पाककृती..चला तर आपण आज लाल भोपळ्याची मेथीदाणा घालून केलेली खमंग भाजी पाहूया आणि खाऊ या..😋 Bhagyashree Lele -
दुधी भोपळ्याची भाजी (Dudhi Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
#CCRमाझी कुकर रेसिपीकुकर हा स्वयंपाक घरा मधील सर्वात अविभाज्य घटक आहे कुकर मुळे बरीचशी पदार्थ कमी वेळेत .करायला मदत होते .अशीच एक मी तयार केलेली कुकर मधील दुधी भोपळ्याची भाजी रेसिपी .भाजी आपण टिफिनला पण देऊ शकतो Sushma pedgaonkar -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr :नवरात्र दिवस २: आज मी देवीला लाल भोपळ्याची खीरे चां निवेध्य केला. भोपळा हा रेशेदार आहे आणि त्यातून व्हिटॅमिन A , E आणि C चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे ते डोळे आणि त्वचे साठी गरजेचं आहे आणि शक्ती वर्धक पण आहे महणुन नेहमी भोपळा आप्ल्या आहारात समावेश करावा. Varsha S M -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचानवरात्री रेसिपी चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.नववा घटक - दुध व लाल भोपळालाल भोपळ्याची खीर हा देवीचा आवडता नैवेद्य आहे.उपवासासाठी ही रेसिपी चालते.ही माझी 401 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
दुधी भोपळ्याची रस्सा भाजी (dudhi bhoplyachi rassa bhaji recipe in marathi)
#दुधी भोपळ्याची भाजी Sumedha Joshi -
लाल भोपळ्याची बाखर भाजी (laal bhoplyachi bhakar bhaji recipe in marathi)
#ngnr लाल भोपळ्याची बाखर भाजी ही एक पारंपरिक, चविष्ट आणि पौष्टिक भाजी आहे.कांदा-लसुण विरहित असूनही खमंग लागते.ही भाजी विशेषतः विदर्भात केली जाते. Pragati Hakim -
काशीफळ/लाल भोपळ्याची भाजी (Lal Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRRपारंपरिक रेसिपीसपितृपक्षात केली जाणारी एक भाजी. Sujata Gengaje -
-
दुधी भोपळ्याची कोफ्ता करी (Dudhi bhoplyachi kofta curry recipe in marathi)
#MBR दुधी भोपळ्याची भाजी तितकी आवडीने खाल्ली जात नाही . पण ही फळभाजी खूप गुणकारी आहे.ही भाजी पचनास हलकी असते.दुधी भोपळ्याचे अनेक पदार्थ केले जातात.मी यांची कोफ्ता करी बनवली आहे नक्की करून पहा. आशा मानोजी -
तांबड्या भोपळ्याची भाजी (Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
#BKR#भाजी आणि करी रेसिपीज Sumedha Joshi -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nnr#लाल भोपळानवरात्र स्पेशल दिवस दुसरानवरात्रीमध्ये रोज उपवासाला नवीन काय बनवायचे हा प्रश्न स्त्रियांना पडतो साबुदाणा वरी खायला नको वाटते तेव्हा लाल भोपळा हा खूप छान ऑप्शन आहे लाल भोपळ्याचे तुम्ही अनेक पदार्थ बनवून खाऊ शकता हा आपल्यासाठी खूप पौष्टिक सुद्धा आहे लाल भोपळा तुम्हाला हायड्रेट ठेवतो वजन कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते . लाल भोपळा आरोग्यासाठी खूप चांगला आहे आपण नियमित आहारात ठेवायला हवा Smita Kiran Patil -
बाकर भाजी (भोपळ्याची भाजी) (bhoplyachi bhaji recipe in marathi)
#ngnrविदर्भात कोहळ्याच्या भाजीला बाकर भाजी ही म्हणतात.म्हणजेच भोपळ्याची भाजी.कांदालसणाशिवाय केलेल्या या भाजीची प्रत्येक सणवार ,कुळाचाराला हजेरी असतेच.कांदा ,लसुण न घालताही ही बाकर भाजी खुप छान चमचमीत ,टेस्टी होते.करुन पहा तुम्ही पण...... Supriya Thengadi -
लाल भोपळ्याची भाजी (laal bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनरकूकपॅड कडून मिळालेल्या डिनर प्लॅनप्रमाणे लाल भोपळ्याची भाजी तयार केली. लाल भोपळा म्हटला म्हणजे माझ्यासाठी फक्त छान छान गोष्टी तले 'चाल रे भोपळ्या टुणुक टुणुक आजीची गोष्ट' माझ्या आठवणीत आहे माझ्या लहानपणापासून मी कधीच लाल भोपळ्याची भाजी खाल्ली नाही म्हणजे ते आमच्या खाद्य-संस्कृती ती भाजी खात नाही असे काहीतरी आहे मी बऱ्याच विचारायचा प्रयत्नही केला पण काही कळलेच नाही का खात नाही त्याचे शास्त्र काही माहीतच नाही इतके सांगितले गेले की आपण ती भाजी खात नाही. लग्नानंतर बऱ्याच वर्षानंतर ज्या ठिकाणी मी राहते इथे तर खूपच माझ्या आवडीप्रमाणे मला वातावरण मिळाले मुंबईत खाद्यसंस्कृती म्हणजे आपण बऱ्याच लोकांच्या खाद्यसंस्कृतीत बऱ्याच वेगवेगळ्या लोकांमध्ये राहतो त्यामुळे त्यांची खाद्यसंस्कृती आणि खाण्याचे पदार्थ ही करून बघायला खायला मिळतात. हे आवर्जून सांगायचीनंतर कद्दू, भोपळा ,डांगर ,कोळा ,पंपकीन अशी बरीच नावे कळली जेव्हा टेस्ट केला तेव्हा मी माझ्या आहारात त्याचा समावेश केला आणि आता बऱ्याचदा मी बनवूनही खाते आजही मी माझ्यासाठी बनवले आहेफोडणीत मेथीदाना टाकल्यामुळे याचा टेस्ट खूप छान जबरदस येतो जेव्हा फोडणी देतो त्याचा सुगंधित सुवास सगळीकडे पसरतो. या भाजीबरोबर वरण भात हवाच अजून छान लागतो. रेस Chetana Bhojak -
शेवभाजी (Shevbhaji Recipe In Marathi)
झणझणीत पदार्थ खाणाऱ्यांची संख्या भरपूर आहे शेव भाजी हा एक झणझणीत प्रकार आहे भाजी नसली की ही शेव भाजी बनवता येते चला तर मग बनवूयात शेव भाजी Supriya Devkar -
लाल भोपळा / काशी फळ भाजी (lal bhopla bhaji recipe in marathi)
#काशी फळ#लाल भोपळा#तांबडा भोपळालाल भोपळा म्हंटलं की लहान पाणीची गोष्ट आठवते... आणि ती आवडती गोष्ट म्हणजे "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक" ... आणि हे जरी म्हंटल तरी चेहऱ्यावर अजूनही हसू येते ... अशी ही रुचकर भाजी ...ह्या भाजी चे वेगवेगळे पदार्थ अगदी नैवेद्य चा पानात आवर्जून असतातच. लाल भोपळा भरीत (बिना कांदा लसूण), भाजी, घारगे, पुऱ्या, थालीपीठ, इ...विशेष म्हणजे ही भाजी अगदी सोळा सोमवार चा नैवेद्य ला आवर्जून असते, तसेच श्राद्ध ला पण आवर्जून केली जाते. पचायला हलकी, रोग प्रतिकारशक्ती वाढते, स्किन चे texture सुधारते, मधुमेहींना सुद्धा उपयुक्त, वजन कमी करायला पण या भाजी चा वापर करतात.या भाजीत व्हिटॅमिन A, E तसेच भरपूर प्रमाणात आयर्न मिळते. Sampada Shrungarpure -
हदग्याच्या फुलांची चमचमीत भाजी (hadgyachya fulanchi bhaji recipe in marathi)
हादग्याची फुलेही हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर मिळतात या फुलांची भाजी आणि भजी दोन्ही पदार्थ अप्रतिम चवीचे होतात आज आपण हादग्याच्या फुलांची भाजी कशी बनवतात ते पाहूयात अगदी सोपी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते प्राथमिक बनवण्यात हादग्याच्या फुलांची चमचमीत भाजी Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या