खट्टा बेसन ढोकळा (Khatta Besan Dhokla Recipe In Marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
#SDR
हलका फुलका बेसनाचा खट्टा ढोकळा...
खट्टा बेसन ढोकळा (Khatta Besan Dhokla Recipe In Marathi)
#SDR
हलका फुलका बेसनाचा खट्टा ढोकळा...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेसन आणि ताक घ्या.कोमट पाणी घ्या.
- 2
आता या बेसनात ताक आणि लागेल तसे कोमट पाणी घालुन बॅटर करुन पंधरा मिनीट झाकुन ठेवा.
- 3
पंधरा मीनीटानी या मधे आलेमिरची पेस्ट,मीठ,साखर चवीनुसार,व सर्वात शेवटी ईनो घालुन छान फेटुन घ्या.मग स्टीमर मधील प्लेटला तेलाने ग्रिसींग करुन हे मिश्रण त्यावर पसरवुन स्टीमर मधे पंधरा मिनीट ठेवुन वाफवुन घ्या.
- 4
वाफवुन झाल्यानंतर थोडा गार होउ द्या.ढोकळा छान स्पॉंजी झालेला असेल.आता यावर घालण्याची फोडणी करुन घ्या.
- 5
एका तडका पॅन मधे तेल गरम करुन त्यात मोहरी,जीरे,तीळ,मिरची घालुन छान तडका करुन या ढोकळ्यावर घाला.वरुन कोथींबीर,शेव घाला.
- 6
मस्त खट्टा बेसन ढोकळा खाण्यासाठी तयार आहे,सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16252678















टिप्पण्या (15)