मसाला पाव (Masala Pav Recipe In Marathi)
मसाला पाव (Masala Pav Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साहित्य
- 2
प्रथम पॕनमध्ये १ चमचा तेल गरम करून त्यात जीर आणि राई घालून त्यात २ कांदे बारीक कापून घालावे आणि थोडा सोनेरी झाल्यावर त्यात ४ हिरव्या मिरच्या घालून त्यात
- 3
२ टॉमेटो घालून तो जरा मऊ झाला की, त्यात १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा हळद
- 4
१/२ चमचा मीठ, १चमचा पाव भाजीचा मसाला घालून त्यात बारीक कापलेली काकडी घालून....
- 5
ते सर्व छान एकत्र परतून त्यात उकडलेले २ बटाटी कुसकरुन घालून ते छान एकजीव करून घ्यावे. आणि आता त्यात बारीक कापलेली कोथिंबीर घालावी.
- 6
अश्या प्रकारे भाजी तयार झाली आहे. आता ती भाजी थंड करून घ्यावी.
- 7
आता हिरवी चटणी करून घेऊयात..... प्रथम १ वाटी कोथिंबीर, १ चमचा अल + लहसूण पेस्ट, पाव वाटी दही, १/२ चमचा मीठ, १ चमचा साखर, ४ हिरव्या मिरच्या, १ चमचा जीर आता हे सर्व मिक्सर मध्ये वाटुन घ्यावे. पाणी आजिबात घालू नये. अश्या प्रकारे तिखट आंबट गोड हिरवी चटणी तयार आहे.
- 8
आता पाव मधोमध कापून वरच्या भागावर हिरवी चटणी लावावी.आणि दुसऱ्या वर टॉमेटो केचप लावावे. आता तयार केलेली भाजी किंवा (सारण) त्या मध्ये घालून त्यावर बारीक शेव घालावी.आता पाव बंद करून घ्यावे. आता पॕनमध्ये अमुल बटर घालून ते पाव दोन्ही बाजूंनी शेकवून घ्यावे.
- 9
तर अश्या प्रकारे आपला मसाला पाव तयार आहे.....
Keywords
Similar Recipes
More Recipes

























टिप्पण्या (5)