व्हेजिटेबल सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi)

#सांबार... इडली,दोसा , सांबार वडा सोबत अतिशय चवीने खाल्ला जाणारा सांबार आज मी बनवला आहे यात आपल्याला आवडतील त्या भाज्या मिक्स करून आपण हा सांबर बनवू शकतो तसाच मी आज बनवला आहे....

कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुरीच्या डाळीचे वरण शिजवून घेणे.... नंतर सगळ्या भाज्या धूवून चिरून घेणे....
- 2
गॅसवर कढईत तेल गरम करणे त्यात मोहरी, जीरे टाकले ते तडतडले की त्यात कढीपत्ता हिंग लाल मिरची टाकणे नंतर त्यात कांदे टाकून 1 सेकंद परतावे आणि नंतर सगळ्या भाज्या चीरलेल्या टाकणे....
- 3
भाज्यांमध्ये हळद टाकणे मिक्स करणे आणि झाकण ठेवून भाज्या अर्धवट शिजेपर्यंत शिजू देणे.... नंतर झाकण काढून त्यात तिखट,धने पूड,सांबार मसाला आणि मीठ टाकून मिक्स करणे....
- 4
शिजलेल्या भाज्यांमध्ये तुरीच्या डाळीचे वरण टाकणे पाणी टाकणे आणि नंतर चिंचेचा कोळ आणि गूळ किंवा साखर टाकून खळखळ पाच ते दहा मिनिट पूर्णपणे शिजू देणे उकळू देणे. 1 टीस्पून सांबार मसाला उकळताना टाकणे कोथिंबीर टाकणे... टेस्ट घेऊन मीठ गुळ/साखर ॲड करणे...
- 5
सांबार तयार इडली, डोसा सोबत सर्व्ह करावे
- 6
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या