खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)

#DDR
दिवाळी फराळ रेसिपीज
चटपटीत प्रकार फराळा मध्ये सगळ्यांनाच आवडतात. खारे शंकरपाळे तर कधी नुसतेच किंवा चहा सोबत पण खायला आवडतात. मी खारे शंकरपाळे केले.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैदा गाळुन घेतला.जिर, ओवा मिक्सर मधुन अर्धवट बारीक करून घेतला.
- 2
एका परातीत मैदा घेतला. त्यात रवा, बारीक केलेल जिर, ओवा,मीठ, चिमूटभर सोडा घातला. गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून मोहन घालून घट्ट गोळा भिजवून घेतला.
- 3
थोडावेळ भिजलेला गोळा झाकुण ठेवला. एका वाटीत मैदा आणी तेल मिक्स करून पेस्ट तयार करून घेतली.नंतर भिजलेला मैदा मळुन घेतला.
- 4
आता दोन गोळे करून दोन पोळ्या लाटून घेतल्या.एका पोळीवर पेस्ट लावली.
- 5
त्यावर दुसरी पोळी ठेऊन हलकस लाटून घेतल.
- 6
आता लाटलेल्या पोळीचे शंकरपाळे पाडुन घेतले.
- 7
गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून तळुन घेतले.
- 8
आता कुरकुरीत खारे शंकरपाळे तयार झाले.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या