मिक्स डाळींचे फोडणीचे वरण
#CCR
कूक विथ कूकर
कुकिंग सूचना
- 1
एका ताटात डाळी काढून घ्या. कूकर मध्ये पाणी घालून डाळी स्वच्छ धुवून घ्या. आणि 2 ग्लास पाणी घालून 4 सिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या.
- 2
कूकर थंड होईपर्यंत कांदा टोमॅटो हिरवी मिरची चिरून घ्या. कढीपत्ता धुवून चिरून घ्या. आता डाळीचा कूकर उघडुन घ्या.
- 3
एका भांड्यात तेल गरम करून मोहरी तडतडल्यावर जीरे घालावे. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. आता त्यात हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग घालून परतून घ्या. आले लसुण पेस्ट, तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ आणि टोमॅटो घालून 2मिनिट शिजवून घ्या. टोमॅटो शिजल्यावर कूकर मधील डाळ मिक्स करून घ्यावी.
- 4
आवशक्तेनुसार गरम पाणी घालून 2 ते 3 उकळ्या येऊ द्या. शेवटी गरम मसाला आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. गरम गरम फोडणीचे वरण भाताबरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16613101













टिप्पण्या