वाल बटाटा खिचडी (Val Batata Khichdi Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#CCR #कुक विथ कुकर #खिचडी हा प्रकार करायला सोपा व कुकर मुळे तर झटपट होणारा रात्रीच्या जेवणासाठी खिचडी वेगवेगळ्या डाळी भाज्यांपासुन बनवता येतात आज मी कडवे वाल, बटाटा वापरून खिचडी केली आहे चला तर बघुया रेसिपी

वाल बटाटा खिचडी (Val Batata Khichdi Recipe In Marathi)

#CCR #कुक विथ कुकर #खिचडी हा प्रकार करायला सोपा व कुकर मुळे तर झटपट होणारा रात्रीच्या जेवणासाठी खिचडी वेगवेगळ्या डाळी भाज्यांपासुन बनवता येतात आज मी कडवे वाल, बटाटा वापरून खिचडी केली आहे चला तर बघुया रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम वाडा कोलम तांदुळ
  2. ५० ग्रॅम कडवे वाल निवडलेले
  3. 2मध्यम बटाटे
  4. 1कांदा उभा चिरलेला
  5. 5-6कडिपत्याची पाने
  6. २-४ लसुण पाकळ्या
  7. 1 टिस्पुनआलेलसुण पेस्ट
  8. 1 टिस्पुनमोहरी
  9. 1 टिस्पुनजीरे
  10. 1/4 टिस्पुनहळद
  11. 1-2 टिस्पुनकोल्हापुरी कांदा लसुण मसाला
  12. 1 टिस्पुनमिरची लसुण ठेचा
  13. 1 टिस्पुनटोमॅटो प्युरी
  14. 1 पिंचहिंग
  15. चविनुसारमीठ
  16. 2 टेबलस्पुनसाजुक तुप
  17. 1 टिस्पुनतेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    वाल बटाटा खिचडी साठी लागणारे साहित्य काढुन ठेवा

  2. 2

    कुकरमध्ये तेल व तुप गरम झाल्यावर त्यात मोहरी, जीरे, कडिपता, ठेचलेला लसुण, हिंग, मिरचीलसुण ठेचा व उभा चिरलेला कांदा चांगला परतुन घ्या नंतर त्यात उभे चिरलेले बटाटे कडवे वाल, हळद, कांदा लसुण मसाला मिक्स करून परतुन घ्या

  3. 3

    नंतर त्यात वाडा कोलम धुतलेले तांदुळ मिक्स करून परता त्यात आवश्यकते नुसार गरम पाणी व चविनुसार मीठ टोमॅटो प्युरी मिक्स करा व कुकरचे झाकण लावुन १-२ शिट्टया काढा

  4. 4

    आपली वाल बटाटा खिचडी खाण्यासाठी रेडी

  5. 5

    गरमागरम वाल बटाटा खिचडी प्लेटमध्ये घेऊन सोबत पापड, तांदळाची कुरडई व खारवड्या सोबतच आंबेहळदीचे लोणचे ठेवुन डिश सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes