नागपूरची सांबार वडी (Nagpur Sambhar Vadi Recipe In Marathi)

#HV ..
हिवाळा म्हटलं की हिरव्या पालेभाज्यांची मजा .. याच वेळेस मिळणाऱ्या छान पालेगळ सांबार किंवा कोथिंबीरच्या वड्या प्रत्येक घरी व्हायलाच पाहिजे. महाराष्ट्रभर सांबार वडी किंवा कोथिंबीर वडी करण्याची पद्धत वेगवेगळी. आज दिलेल्या रेसिपी मध्ये ही नागपूरची सांबारवाडी .. सोबत कढी सर्व्ह करण्याची पद्धत आहे इकडची. अतिशय चविष्ट आणि खमंग अशी ही.. आणि आज मी केलेली आहे बिना कांदा लसणाची . तेव्हा बघूया.

कुकिंग सूचना
- 1
मैदा आणि बेसन चाळून घ्यावे. एका परातीत ते घेवून, त्यात हळद, मीठ, ओवा आणि गरम तेल, मोहन टाकावे.
- 2
त्याला चांगले चोळून घ्यावे. नंतर थोडे थोडे पाणी घालून गोळा करून घ्यावा. 10-15 मिनिटे झाकून बाजूला ठेवावे.
- 3
तोपर्यंत सांबार/कोथिंबीर पाण्याने धुऊन निथळून घ्यावे आणि बारीक चिरून घ्यावी. इतर सर्व सामग्री एकत्र ठेवावी.
- 4
गॅसवर एका कढईत तेल टाकून ते गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी, हिरवी मिरची टाकावी. खडबडीत कुटलेले धणे, सोप, चारोळी, तीळ टाकून मिक्स करावे.
- 5
नंतर त्यात खोबरे किस टाकून दोन मिनिट परतून घ्यावे. आता त्यात शेंगदाणा कूट, किसमिस टाकून पुन्हा मिक्स करावे.
- 6
हळद, तिखट, गोडा मसाला घालून चांगले परतून घ्यावे. आता त्यात चिरलेली कोथिंबीर घालून छान एकत्र करून दोन मिनिट शिजवावे.
- 7
त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, साखर आणि आमचूर पावडर टाकून एकत्र करावे. मिनिट भराने गॅस बंद करावा. सांबार वडीचे सारण तयार झाले आहे.
- 8
आता झाकून ठेवलेले पीठ मळून त्याचे पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घ्यावे. एक गोळा घेवून, छोट्या आकारात लाटून घ्यावी.
- 9
त्यात मध्ये2 टेबलस्पून सारण भरावे. पोळीच्या सर्व कडा पाणी लावून घ्याव्यात. आणि त्याची फोल्ड करावी. उघड्या दोन्ही बाजू चांगल्या बंद करून घ्याव्यात.
- 10
अशा प्रकारे सर्व वड्या तयार करून घ्याव्यात.
- 11
तो पर्यंत गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाल्यावर, तयार केलेल्या वड्या, मध्यम आचेवर, सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
- 12
आणि टिश्यू पेपर वर काढून घ्याव्यात. मस्त खमंग, सांबार वडी तयार आहे.
- 13
ही वडी, गरमागरम, कढी, फोडणीचे ताक, टोमॅटो केचप सोबत सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)