कर्ड राईस (Curd Rice Recipe In Marathi)

Manisha Satish Dubal @manishadubal
#RDR
साधी सोप्पी अशी ही डिश.. साऊथ इंडियन समारंभाला हमखास बनणारी ही डिश...
कर्ड राईस (Curd Rice Recipe In Marathi)
#RDR
साधी सोप्पी अशी ही डिश.. साऊथ इंडियन समारंभाला हमखास बनणारी ही डिश...
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ स्वच्छ धुऊन, चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घालून भात मऊ शिजवून घ्यावा. दही व दूध एकत्रित फेटुन घ्यावे. त्यानंतर त्यात आले मिरची पेस्ट, साखर, मीठ मिक्स करावे.
- 2
शिजलेला भात व फेटलेले दही मिक्स करावे. त्यानंतर फोडणीचे भांडे गरम करून साजूक तुपाची फोडणी करावी. त्यात मोहरी, कढीपत्ता, हिंग, लाल मिरच्या, उडीद डाळ, चणाडाळ फोडणीला घालावी.
- 3
दहिमिश्रित भातावर ही तयार फोडणी घालावी. सर्व मिक्स करावे. असा हा दहिभात म्हणजेच "कर्ड राईस" चवीला छान लागतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- रगडा पॅटीस (Ragada Patties Recipe In Marathi)
- कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
- झटपट तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
- मालवणी मसाला घालून पावभाजी नेहमी पेक्षा वेगळी चव (Malvani Masala Pav Bhaji Recipe In Marathi)
- कोथिंबीर मसाला पुरी (Kothimbir Masala Puri Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16703911












टिप्पण्या